सोलापूर

अशोक कामटे यांना मारहाण; रवी पाटलांसह इतर आरोपी निर्दोष!

Ashok Kamte Solapur Ravi Patil Old Crime Case News

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : सात रस्ता येथील बंगल्यामध्ये मध्यरात्री बेकायदेशीरपणे घुसल्याने सोलापूरचे तत्कालीन पोलीस आयुक्त अशोक कामटे यांना हाताने मारहाण करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी माजी आमदार रविकांत शंकरेप्पा पाटील (६८ वर्षे, रा. सोरेगांव, ता. उत्तर सोलापूर यांच्यासह इतर ७ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

यात हकीकत अशी की, दि.१६/०८/२००७ रोजी तत्कालीन आमदार रविकांत शंकरेप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सात रस्ता येथील बंगल्यासमोर त्यांचे समर्थक रात्री १२.०० वाजण्याच्या सुमारास फटाके वाजवून जल्लोष करीत होते. त्यामुळे पेट्रोलिंग करणारे सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रकाश भोसले, पोलीस निरिक्षक श्रीरंग कुलकर्णी, पोलीस उपनिरिक्षक बाबासाहेब कुलकर्णी त्याठिकाणी आले. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाने रात्री फटाके वाजवू नका असे सांगत असताना वायरलेसवरुन संदेश प्राप्त झाल्याने त्याठिकाणी पोलीस निरिक्षक शहाजी नरसुडे, पोलीस उपआयुक्त लक्ष्मण भोसले व पोलीस आयुक्त अशोक कामटे हे त्याठिकाणी आले. त्यानंतर रविकांत पाटील यांनी मी आमदार आहे, ते माझे कार्यकर्ते आहेत, त्यांना फटाके वाजवू द्या, ताब्यात घेवू नका.. असे म्हणून हरकत घेवू लागले.

त्यावेळी पोलीसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत असताना, रविकांत पाटील यांनी पोलीस आयुक्त अशोक कामटे यांच्या अंगावर जावून धक्काबुक्की केली व जिवे ठार मारण्याची धमकी देवून कार्यकर्त्यांना अटक करतेवेळी मज्जाव करुन, शासकीय कामात अडथळा निर्माण केला अशा आशयाची फिर्याद सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल केल्याने, रविकांत पाटील यांच्यासह उदयशंकर पाटील, गणेश कटारे, राम खांडेकर, श्रीशैल खंदारे, मल्लिनाथ निरगुडे, सदाशिव मस्के, कल्लप्पा वाघमारे, जब्बार शेख, बाळासाहेब घुले यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तल्कालीन पोलीस निरिक्षक शहाजी नरसुडे यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

सदर खटल्यामध्ये सरकारतर्फे एकुण ११ साक्षीदार तपासण्यात आले आहे. खटल्याचे अंतिम युक्तीवादावेळी आरोपीतर्फे ॲड. मिलिंद थोबडे यांनी घटनेवेळी पोलीसांनी बेकायदेशीरपणे रविकांत पाटील यांचे घरामध्ये मध्यरात्री प्रवेश करुन, गोंधळ घालून त्यांना धक्काबुक्की करुन जखमी केले व ते आमदार असल्याने पोलीसांच्या बेकायदेशीर कारवाईमुळे कारवाई करतील म्हणून खोटया आशयाची फिर्याद दिल्याचे सांगून लावण्यात आलेल्या कलमांची गृहितके शाबित करण्यात आली नसल्याचे सांगून त्यापृष्ठर्थ्य मे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले. ते ग्राहय धरुन मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आर.जे. कटारिया यांनी रविकांत पाटील यांच्यासह ७ जणांची निर्दोष मुक्तता केली.

यात आरोपीतर्फे ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. राजकुमार मात्रे, ॲड. व्ही.डी. फताटे, ॲड. विक्रांत फताटे, यांनी तर सरकारतर्फे ॲड. प्रकाश जन्नू यांनी काम पाहिले.

Related Articles

Back to top button