सावधान.. आसरा चौकात तुमची गाडी पंक्चर होऊ शकते!
सोलापूर : दिवसभरात हजारो वाहनांची वर्दळ असलेल्या आसरा चौक परिसरात सिग्नलच्या ठिकाणी खिळे पडले आहेत.
आज सोमवार दिनांक 16 मार्च 2026 रोजी दुपारी साडेबारा ते पावणे एकच्या सुमारास जुळे सोलापुरातील डी मार्टकडून आसरा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सिग्नलच्या ठिकाणी वेगवेगळ्या आकाराचे खिळे पडल्याचे दिसून आले.
हे खिळे कोणाच्यातरी पिशवीतून पडले असण्याची शक्यता आहे. किंवा मग कोणीतरी गाड्या पंक्चर व्हाव्यात या उद्देशाने सिग्नलच्या ठिकाणी टाकले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे हे खेळे वेगवेगळ्या आकाराचे आहेत.
पत्रकार, स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाचे संपादक परशुराम कोकणे हे जुळे सोलापूर डी मार्टकडून आसरा चौकाकडे येत होते. सिग्नलच्या ठिकाणी अचानक त्यांचे लक्ष खाली पडलेल्या वेगवेगळ्या आकारांच्या खिळ्यांकडे गेले. एकाच ठिकाणी वेगवेगळ्या आकाराचे खिळे पडल्याचे दिसताच पत्रकार परशुराम कोकणे यांनी आपली दुचाकी बाजूला लावली. चौकात आजूबाजूला पाहिले, मात्र प्रत्येकजण आपापल्या गडबडीत असल्याचे दिसून आले.
या खिळ्यांमुळे वाहने पंचर होणार! भर उन्हात लोकांना त्रास होणार! या विचाराने पत्रकार परशुराम कोकणे यांनी पायाने ढकलत सर्व खिळे बाजूला करण्याचा प्रयत्न केला. डोळ्याला दिसतील, शक्य होतील तेवढे खिळे बाजूला घेतले आहेत मात्र आणखी काही खिळे सिग्नल चौकात असण्याची शक्यता आहे.
पत्रकार परशुराम कोकणे हे भर उन्हात सिग्नल चौकात खिळे बाजूला घेत असताना काही लोकांनी पाहिले मात्र मदतीला येण्याचं कुणीही प्रयत्न केला नाही.
तुम्ही या चौकातून जाणार असाल किंवा कोणी मित्र नातेवाईक जाणार असेल तर आवर्जून सांगा. आसरा चौकात सिग्नलच्या ठिकाणी आणखी काही ठिकाणी खिळे पडले असण्याची किंवा कोणीतरी मुद्दामून टाकले असण्याची शक्यता आहे. वाहन पंक्चर होऊ नये, लोकांनी काळजी घ्यावी या उद्देशाने ही बातमी / माहिती प्रसारित केली आहे.
🔴 ★ बातमीसोबत जोडलेला फोटो AI ने तयार केला आहे. प्रत्यक्षात वेगवेगळ्या आकाराचे खिळे पडले आहेत. 🔴 ★










