राजकीय

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सोलापूर दौरा

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : महाविजय 2024 अंतर्गत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवार दिनांक 27 डिसेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राज्यव्यापी ‘महाविजय २०२४’ लोकसभा प्रवासात बुधवार, दि. 27 डिसेंबर २०२३ रोजी सोलापूर लोकसभा क्षेत्राचा दौरा करणार आहेत. या प्रवासात दुपारी तीन वाजता रंगभवन सभागृहात ते लोकसभा क्षेत्रातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरिअर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.

Jayesh-Darbi-Collection
Jayesh-Darbi-Collection

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रवासात प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे यांच्यासोबत लोकसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी व पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

पंढरपूर येथील कार्यक्रम
सकाळी १० वा. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात श्री विठ्ठलाचे दर्शन घेतील व त्यानंतर सकाळी १०.३० वा. पंढरपूर येथील जोगेश्वरी हॉल येथे मोहोळ व पंढरपूर या दोन विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरियर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.

यासोबतच ते पंढरपूर व सोलापूर येथे काही प्रतिष्ठित नागरिकांच्या स्नेह भेटी घेणार आहेत व भाजपा संघटनात्मक बैठकीत सहभागी होतील.

प्रदेश अध्यक्षांच्या प्रवासाचे नियोजन व तयारी खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, आमदार समाधान अवताडे, सोलापूर पूर्व जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी, आ. सुभाष देशमुख, आ. विजय देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष तथा लोकसभा प्रवास संयोजक संजय (बाळा) भेगडे, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, पश्चिम महाराष्ट्र भाजपा विभागीय संघटन मंत्री मकरंद देशपांडे, लोकसभा समन्वयक अमर साबळे, लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख, सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष नरेंद्र काळे, सोलापूर पश्चिम जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, प्रशांत परिचारक, उदयशंकर पाटील यांच्यासह सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी व सर्व प्रमुख पदाधिकारी व जिल्हा कार्यकारिणीतील सर्व प्रमुख कार्यकर्ते करीत आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. बुधवारी सकाळी पंढरपूर येथे बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी चंद्रकांत बावनकुळे सोलापुरात येतील. सोलापूर शहरातील वॉरियर्सची बैठक होणार आहे. त्यानंतर कोअर कमिटीची मीटिंग होणार आहे, अशी माहिती शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी दिली आहे.

विचार व विकासासाठी शिंदे-पवार भाजपासोबत

– चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
• माढा लोकसभा क्षेत्रात प्रदेशाध्यक्षांचा प्रवास
• विरोधकांना जनता ४४० व्होल्टचा करंट लावणार
• संपर्क से समर्थन अभियानात फलटणकरांशी संवाद
• फलटण व अकलुज येथे भाजपा सुपर वॉरियर्सना मार्गदर्शन
• महाराष्ट्रात महायुतीाच ४५ जागांवर महायुती विजय निश्चित

उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विचारांना तडे दिले, यामुळे तर पंतप्रधान मोदी हेच सर्वोत्तम भारत निर्माण करू शकतात हा विश्वास असल्याने एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपासोबत आले आहेत, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. दोन्ही नेते विचार व विकासासाठी एकत्र आले आहेत.

‘महाविजय-२०२४’ अभियानांतर्गत मंगळवारी ते माढा लोकसभा क्षेत्रात प्रवासावर होते, त्यावेळी ते फलटण येथे संपर्क से समर्थन अभियानात जनतेशी संवाद साधत होते. ते म्हणाले, महाविकास आघाडी काळात महाराष्ट्र थांबला होता. उद्धव ठाकरे यांचे सरकार अडीच वर्षे फेसबुक लाईव्हवर होते. थांबलेला महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात गतिमान करण्यासाठी एकनाथ शिंदे सोबत आले, तर अजित पवारांनी मोदीजींच्या सर्वोत्तम भारताच्या संकल्पाला साथ दिली आहे. विरोधकांनी एकत्र येऊन कितीही मुठी आवळल्या तरी जनता ईव्हीएमवर कमळाचे बटन दाबून त्यांना ४४० व्होल्टचा करंट लावणार आहे.

त्यांच्या या प्रवासात खासदार रणजित नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आ.राम सातपुते, प्रदेश उपाध्यक्ष तथा लोकसभा प्रवास संयोजक संजय (बाळा) भेगडे, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, पश्चिम महाराष्ट्र भाजपा विभागीय संघटन मंत्री मकरंद देशपांडे, लोकसभा समन्वयक राजकुमार पाटील, लोकसभा निवडणूक प्रमुख प्रशांत परिचारक, सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सोलापूर दक्षिण जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, डॉ. दिलीप येळगावकर, सोमनाथ भोसले, सचिन कांबळे, नवनाथ पडळकर, अनुप मोरे, धैर्यशील मोहिते पाटील, बजरंग गावडे, अमोल सास्ते, जयकुमार शिंदे, सचिन अहिवळे यांच्यासह सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी व सर्व प्रमुख पदाधिकारी व जिल्हा कार्यकारिणीतील सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

मुस्लिमांकडून श्रीरामाची प्रतिमा भेट

फलटण येथे ‘संपर्क से समर्थन’ अभियात सुमारे १५० मुस्लिम बांधवांनी श्री बावनकुळे यांची भेट घेवून त्यांना प्रभू श्री रामाची प्रतिमा भेट दिली. याचा उल्लेख करीत श्री बावनकुळे त्यांच्या राष्ट्रभक्ती व देशभक्तीचा सन्मान केला. ५२७ वर्षे आणि २५ पिढ्यांपासून प्रभू रामाची पूजा एका तंबूत केली जाते. पंतप्रधान मोदीजी यांनी अयोध्येत जगातील सर्वांत सुंदर श्रीरामाचे मंदिर बांधले असून त्याच्या उद्घाटनाच्या दिवशी २२ जानेवारीला जगातली सर्वांत मोठी दिवाळी साजरी केली जाणार आहे.

विजयाचे शिल्पकार व्हा

माढा लोकसभा प्रवासात फलटण (जि. सातारा) येथे मान व फलटण या विधानसभा तर अकलूज (जि. सोलापूर) येथे करमाळा, माढा, सांगोला व माळशिरस या विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरियर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले ,२०२४ मध्ये पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. यावेळी केवळ विजय नव्हे तर महाविजय साकारायचा आहे. हा निर्धार करूनच मी राज्यभरात दौरा करीत आहे. भाजपाचे सुपर वॉरियर्स या विजयाचे शिल्पकार ठरणार आहेत. भाजपा सरकारच्या योजना अंतिम व्यक्तीपर्यंत पोहचविण्यासाठी दररोज तीन तास संपर्क करावा असे आवाहन श्री बावनकुळे यांनी सुपर वॉरियर्संना केले.

४५ जागांवर महायुती विजय निश्चित

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना समाजातील अखेरच्या व्यक्तिपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपाचे सुपर वॉरियर्स प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्रातील जनमत मोदींच्या बाजूने असून लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४५ जागांवर महायुती निश्चित विजय मिळवेल असा दावा बावनकुळे यांनी केला.

Related Articles

Back to top button