सोलापुरात तीन दिवस कलाउत्सव!
Brahman Business Network (BBN) Solapur Exhibition News
BBN कला उत्सव 2024 प्रदर्शन आणि विक्री
सोलापूर : ब्राह्मण बिझनेस नेटवर्क सोलापूर शाखेच्या वतीने दिनांक २७ ते २९ सप्टेंबर २०२४ दरम्यान बीबीएन कला उत्सव २०२४ या प्रदर्शन तसेच विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे, ही माहिती संयोजिका पृथा हलसगीकर आणि महिला टीम यांच्या वतीने आश्लेषा निपुणगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याविषयी अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या की, व्यावसायिक महिला उद्योजिकांना एक हक्काचे व्यासपीठ देण्याचा प्रयत्न, कला उत्सव २०२४ च्या माध्यमातून करण्यात येणार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात अर्थात सिध्देश्वर मंदिराजवळील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत या प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. कला उत्सवाचे यंदाचे हे ७ वे वर्ष आहे.
खास महिलांनी महिलांसाठी आयोजीत केलेल्या या प्रदर्शनचे खास वैशिष्ट्य म्हणजे सहभागी महिला उद्योजिकांना अतिशय वाजवी दरात स्टॉल उपलब्ध करुन देण्यात आहेत.
काय काय असेल?
या प्रदर्शनात आपटे दूध, इलेक्ट्रॉनिक्स – होम अप्लायसेन्स, इमिटेशन ज्वेलरीज, कुंदन ज्वेलरी, वैविध्यपूर्ण साड्या, गिफ्ट आयटम्स, ड्रेस, सायकल, डिझायनर ब्लाऊज, लहान मुलांचे ड्रेस, किचन ट्रोली, विविध प्रकारचे मसाले, पूजा साहित्य, शेती व घरगुती पम्प्स, गोधन उत्पादने, विविध प्रकारचे मसाले, केक, टूर्स व ट्राव्हल, फराळाचे विविध पदार्थ, आयुर्वेदिक उत्पादने, कुरुड्या, पापड, वाघबकारी चहा, बरवा कॉस्मेटिक, मसाजर, बिल्डर व डेव्हलपर खाद्यपदार्थ यासह इतर अनेक गोष्टींच्या स्टॉल्सचा समावेश राहणार आहे. प्रदर्शनात आकर्षक ऑफर्स, दररोज लकी ड्रॉ कूपन शेवटच्या दिवशी RYDER CYCLE तर्फे सायकल बंपर लकी ड्रॉ कूपन करता देण्यात येणार आह, असे ही आश्लेषा निपुणगे यांनी सांगितले.
या बीबीएन कला उत्सवाचा अधिकाधिक सोलापूरकरांनी लाभ घ्यावा. सहकुटुंब, सहपरीवार खरेदीला येऊन येणारा दसरा तसेच दीपावली सणाचा आनंद अधिक व्दिगुणीत करावा, असे आवाहन ब्राह्मण बिझनेस नेटवर्क सोलापूर शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेस पृथा हलसगीकर, मानसी कुलकर्णी, मनीषा औरंगाबादकर, भारती देशक, रुची गोळवलकर, संजय औरंगाबादकर, विश्वजीत कुलकर्णी व श्रीकांत कुलकर्णी यांची उपस्थिती होती.