क्राईम रिपोर्टर्स असोसिएशन अध्यक्षपदी अरुण रोटे, खजिनदारपदी परशुराम कोकणे

Crime Reporters Association Solapur Arun Rote Parshuram Kokane Newe

सोलापूर : क्राईम रिपोर्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी दै.जनसत्यचे अरुण रोटे यांची तर खजिनदारपदी स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाचे संपादक परशुराम कोकणे यांची निवड करण्यात आली आहे.

क्राईम रिपोर्टर संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा ज्येष्ठ क्राईम रिपोर्टर, दै. सुराज्यचे अखलाक शेख व दैनिक लोकमतचे विलास जळकोटकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी पार पडली. त्यामध्ये एक वर्षासाठी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
नूतन पदाधिकारी असे : अध्यक्ष – अरुण रोटे (दै. जनसत्य), – उपाध्यक्ष संताजी शिंदे (दै.लोकमत), तात्या लांडगे (दै. सकाळ), सरचिटणीस रमेश पवार (दै. दिव्य मराठी), खजिनदार – परशुराम कोकणे (स्मार्ट सोलापूरकर), सहचिटणीस – रजनीकांत उपलंची (जनदर्पण चॅनेल).
कार्यकारिणी सदस्य – इरफान शेख, रुपेश हेळवे, मुज्जमिल शहानुरकर, मुन्ना शेख, मुकुंद उकरंडे, रोहन नंदाने, रत्नदीप सोनवणे.
सल्लागार- अखलाक शेख, अनिल कदम, संजय जाधव, सरदार आत्तार, विलास जळकोटकर, अमोल व्यवहारे, धनंजय मोरे, विनायक होटकर, विजयकुमार राजापुरे, भरतकुमार मोरे