सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन

‘सायकल लवर्स’ची 76 किलोमीटर सायकलिंग

On: January 25, 2025 3:55 PM
Follow Us:
HTML img Tag Simply Easy Learning

Cycle Lovers Group Solapur Cycling Activity

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : सोलापुरात 76 व्या गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवार दिनांक 25 जानेवारी रोजी सायकल लवर्स ग्रुपतर्फे 76 किलोमीटर सायकलिंग राईडचे नियोजन करण्यात आले होते.

HTML img Tag Simply Easy Learning

सायकल चालवा आणि पर्यावरण वाचवा.. हा जनजागृतीचा आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण संदेश या माध्यमातून देण्यात आला. आरोग्य आणि आनंद याची सांगड घालण्याचा सायकलिंग हा उत्तम मार्ग आहे असाही मूलमंत्र या राईडच्या माध्यमातून सायकल लवर्स कडून देण्यात आला आहे.

या राईडमध्ये 70 सायकलीस्टनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला होता. त्यामध्ये 11 वर्षे वयोगटापासून ते 65 वर्षे वयोगटातील सायकलपटूंचाही सहभाग होता. अकरा वर्षीय जय जोशी आणि ऋषी कंदलगावकर यांनी ५० किमी अंतर आणि महिला गटामध्ये डॉ शर्वरी आयाचीत यांनी १०० किमी अंतर पार करत विशेष लक्ष वेधून घेतले.

सोलापूरचे गुप्त वार्ता विभागाचे डीवायएसपी मा. नागेश गायकवाड यांनी राईडचा फ्लॅग ऑफ करून रॅलीला हिरवा कंदील दिला. ही राईड भैय्या चौकात सुरू झालेली ही राईड वंदे मातरम् च्या घोषात कामती आणि माचणूर मंदिरा पर्यंत जाऊन परत सोलापूर अशी 76 किलोमीटर अंतराची राईड सर्व सायकल पटूंनी उत्साहात पूर्ण केली.

या राईडचे नियोजन सायकल लव्हर्सचे संयोजक प्रवीण जवळकर, डॉक्टर रूपाली जोशी , दादाराव इंगळे आणि अविनाश कुरापटी यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe Youtube Channel

Join Now