गुन्हे वृत्त

ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार; एसपी अतुल कुलकर्णी यांचा दणका!

Dance Bar under the name of orchestra SP Atul Kulkarnis action

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : पोलीस अधीक्षक अतुल कलकर्णी त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पुष्पक ऑर्केस्ट्रा बारवर छापा टाकून 70 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

मौजे कंदलगाव ता. दक्षिण सोलापूर गावाच्या शिवारामध्ये असलेल्या पुष्पक ऑर्केस्ट्राबार मध्ये काही महीला तोकडे कपडे घालुन बिभत्सपणे अश्लील हावभाव व नृत्य करून डि.जे वर नाचत आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली. त्यावरून श्री. अतुल वि. कुलकर्णी यांनी त्यांचे विशेष पथकास सदर कारवाई बाबत सुचना देण्यात आले होते.

त्या अनुषंगाने विशेष पथक मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीतील कंदलगाव, ता. दक्षिण सोलापूर येथील पुष्पक ऑर्केस्ट्राबार येथे कारवाई करीता गेले असता तेथे मिळुन आलेल्या बातमी प्रमाणे 12 महिला तोकडे कपडे घालुन बिभत्सपणे अश्लील नृत्य व हावभाव करूण डि जे च्या तालावर अश्लील नृत्य करीत असल्याचे व तेथील ग्राहक नृत्यांगनावर नोटा सदश्य कुपन उधळुन अश्लील हावभाव करून नाचताना मिळुन आले तसेच त्यांच्या समोर असलेले सोप्यावर बसलेले काही लोक तसेच स्टेजच्या समोर देखील काही इसम बसले होते, ते नोटा सदश्या कुपन त्या महिलावर उधळत होते, त्या ठिकाणी एकुण 12 बारबाला मिळुन आल्या असुन एकुण 55 ग्राहक तसेच पुष्पक ऑर्केस्ट्रावारचे चालक नामे भारत राजाराम तांबे, रा. शिवाजी नगर, बाळे, सोलापूर व मालक रोहित पांडुरंग चव्हाण, रा. सोलापूर अशा एकुण 70 लोकांविरूध्द मंद्रुप पोलीस ठाणे येथे गुन्हा महाराष्ट्र होटल, उपग्रहे, आणि मदयपान कक्ष, बाररूम, यामधील नृत्य व अश्लिल नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत व त्यामध्ये काम करणारे महिलेच्या प्रतिष्ठेचे संरंक्षण करणेबाबत अधिनियम 2016 चे कलम 3, 8,(1), (2) (4), तसेच भारतीन न्याय संहिता 296 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुष्पक ऑर्केस्ट्राबार येथून 56, लाख 01 हजार 890 रू. किमतीचे ङि जे. साहित्य, ऑर्केस्ट्राबार मधील साहित्य तसेच वाहने, मोबाईल फोन जप्त केले आहे.

सदरची कारवाई ही मा. श्री. अतुल वी. कुलकर्णी, पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनामध्ये सहा. पोलीस अधीक्षक, श्री. राहुल अतराम, पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे, सपोनि अनिल संनगल्ले, पोहेकॉ बिरजदार, पोहेकों गोरे, पोकों जाधव, पोकों गणेश पाटील, महिला पोकों / धनश्री हुळळे, महिला पोकों राऊत, सपोनि पवार, मंद्रुप पोलीस ठाणे व स्टाफ यांनी कारवाई केली आहे.

Related Articles

Back to top button