रक्तदानासाठी गर्दीच गर्दी!
दर्बी चॅरिटेबल ट्रस्टच्या रक्तदान शिबीरात 471 जणांचे रक्तदान
सोलापूर : स्वर्गिय जयरामसा गोपाळसा दर्बी आणि अंबुबाई जयरामसा दर्बी यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने दर्बी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शुक्रवार पेठेतील महावीर सांस्कृतिक भवनमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये 471 रक्तदात्यांनी रक्तदान करून विक्रम केला.
प्रारंभी स्वर्गिय जयरामसा दर्बी आणि स्वर्गिय अंबुबाई दर्बी यांच्या प्रतिमेला राजुसा काटवे, रघुनाथसा बंकापुरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून रक्तदान शिबीराला सुरूवात झाली. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे याचे महत्व ओळखून दर्बी परिवाराच्या वतीने दरवर्षी 12 डिसेंबर रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते. यंदाचे हे सातवे वर्ष आहे.
सकाळी 9 वाजता सुरू झालेले हे रक्तदान शिबीर दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास बंद करण्याची वेळ आली. नागरीक, तरूणांची मोठी झुंबड रक्तदान करण्यासाठी होती. रक्तदान नको असे म्हणण्याची वेळ संयोजक आणि रक्तपेढीवर आली. तरीही अनेकांच्या आग्रहाखातर हे शिबीर दुपारी 3 वाजेपर्यत सुरू ठेवण्यात आले. यामध्ये 471 रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र कार्य पार पाडले. डॉ. हेडगेवार रक्तपेढी, सिध्देश्वर ब्लड बँक आणि शिवशंभू रक्तपेढी अशा तीन रक्तपेढ्यांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबीर पार पडले. रक्तदानासाठी उत्स्फुर्त प्रतिसाद पाहून दर्बी परिवारातील प्रत्येक सदस्यांनी रक्तदात्यांचे मनापासून आभार व्यक्त केले.
यावेळी गोपाळसा दर्बी, नित्यानंद दर्बी, लक्ष्मण दर्बी, जयंत दर्बी, कलबुरगी सर, जयेश दर्बी, संजीव काटवे, गिरीष दर्बी, यशपाल दर्बी, जयेश गोरख,राजेश दर्बी, आमरेश दर्बी, जय दर्बी, पुजा गोरख, अमृता काटवे, ऍड मंगला जोशी – चिंचोळकर, हेमा चिंचोळकर, डॉ. सचिन पांढरे, सुधाकर जाधव, सुतकर सर, सज्जन निचळ यांच्यासह दर्बी परिवार आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.