गुन्हे वृत्त

नाईट्याला येरवड्यात पाठवलं! वाचा काय आहे प्रकरण..

सोलापूर : सराईत गुन्हेगार ओंकार ऊर्फ नाईट्या संतोष नलावडे याला एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्द करण्यात आले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार ओंकार ऊर्फ नाईटया संतोष नलावडे (वय-२५ वर्षे, रा. सुंदराबाई डागा शाळेजवळ, बांध वस्ती, दमाणी नगर, सोलापूर) हा मागील काही वर्षापासुन गुन्हेगारी क्षेत्रामध्ये वावरत आहे. सातत्याने जिवघेण्या घातक शस्त्राने इच्छापुर्वक दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे, लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत किंवा जबर दुखापत पोचवणे, विनयभंग करणे, जबरी चोरी, खंडणी मागणे, गैरकायद्याची मंडळी जमविणे, धाकदपटशा करणे, दगडफेक करणे, घातक शस्त्रांनी धमकवणे या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने, अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे. त्याच्या विरुध्द अश्या प्रकारे गंभीर स्वरुपाचे एकुण ०७ दखलपात्र व ०१ अदखलपात्र गुन्हे सोलापुर शहरात दाखल आहेत. त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापुर शहरातील नागरीकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन, सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. ओंकार ऊर्फ नाईटया नलावडे याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापुर शहरातील सामान्य नागरीकांमध्ये दहशत असुन, त्याचे विरुध्द सामान्य नागरीक उघडपणे पोलीसांना माहीती देत नाहीत.

HTML img Tag Simply Easy Learning

ओंकार ऊर्फ नाईटया नलावडे यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन २०२१ मध्ये क. ११० (ई) (ग) सीआरपीसी अन्वये व सन २०२२ मध्ये क. ५५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ अधिनियमानुसार प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यानंतरही, ओंकार ऊर्फ नाईटया नलावडे, याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालु ठेवली. त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी, मा.एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापुर शहर यांनी, दि.०१/०७/२०२५ रोजी त्याचे विरुध्द एमपीडीए अधिनियम, १९८१ चे कलम ३ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित करुन, त्यास दि.०२/०७/२०२५ रोजी स्थानबध्द आदेशाची बजावणी करुन, येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यात आले आहे.

ही कारवाई एम. राज कुमार, मा. पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली, मा.डॉ. दीपाली काळे पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा), विजय कबाडे पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे, प्रताप पोमण, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-०१, सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे, अरविंद माने, वपोनि, फौजदार चावडी पोलीस ठाणे, सपोनि/तुकाराम घाडगे गुन्हे शाखा, एमपीडीए पथकातील अंमलदार पोहेकॉ-/८३३ विनायक संगमवार, पोहेकॉ/१२५४ सुदीप शिंदे, पोशि/१९१६ अक्षय जाधव, पोशि/६५४ विशाल नवले यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button