सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन
---Advertisement---

अखेर दिलीप मानेंना काँग्रेसची उमेदवारी

On: October 27, 2024 4:47 PM
Follow Us:
---Advertisement---

Dilip Mane Congress Candidate South Solapur

अखेर दिलीप मानेंना काँग्रेसची उमेदवारी!

‘दक्षिण’मध्ये मैत्रीपूर्ण लढत?

परशुराम कोकणे

सोलापूर ‌: सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाने दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर केले आहे. याच मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अमर पाटील यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल किंवा अमर पाटील यांची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते अशी चर्चा आहे.

दिलीप माने यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून मतदार संघात भेटीगाठी, कार्यक्रम करत निवडणुकीची तयारी केली आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली. पहिल्या, दुसऱ्या यादीत नाव न आल्याने दिलीप माने आणि त्यांच्या समर्थकांकडून प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. होटगी रोडवरील दिलीप माने यांच्या निवासस्थानी समर्थकांनी एकत्रित येऊन जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते.

या ठिकाणी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी उपस्थित राहून दिलीप माने यांनाच काँग्रेसचे उमेदवारी मिळेल असे सांगितले होते. अखेर आज पक्षाकडून दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीकडून विद्यमान आमदार सुभाष देशमुख उभे आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अमर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. वंचित बहुजन आघाडी कडून संतोष पवार हे नशीब आजमावत आहेत. आता दिलीप माने यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्याने या ठिकाणी लढत अधिकच रंजक होणार आहे.

पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार कै. भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now