
वकील संघटनांचा मोठा निर्णय! डीजे वाल्यांचे वकीलपत्र..

17 सप्टेंबर 2025 ला डीजे विरोधात काढणार रॅली

DJ Ban Solapur Bar Association advocate Group News
सोलापूर : समाजातील पांढरपेशा वर्ग म्हणून डॉक्टर आणि वकील यांची ओळख असते. एखादी गोष्ट इतर कोणी सांगणे आणि डॉक्टर, वकिलांनी सांगणे यामध्ये फरक आहे. यामुळे डी.जे.(D.J.)बंदीच्या लढ्यात डॉक्टरांपाठोपाठ सर्व वकिलांनीही एकत्र येऊन लढा देण्याचा निर्णय घेतला आहे.
डी.जे.(D.J.)बंदीच्या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदविण्याबरोबरच डी.जे.(D.J.)वाल्यांचे कोणतेही खटले आम्ही वकील घेणार नाही असा निर्धार सोलापूरमधील वकील संघटनांनी केला आहे.
डी.जे.(D.J.)मुक्त सोलापूर कृती समिती, बार असोसिएशन, नोटरी असोसिएशन, आय.टी.एस.टी.पी.(I.T.S.T.P.)च्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्धार करण्यात आला.
प्रारंभी वरिष्ठ पत्रकार सिद्धाराम पाटील यांनी प्रास्ताविक केले. या बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व वकिलांनी डी.जे.(D.J.)वाल्यांची प्रकरणे न हाताळण्याचा ठराव एक मताने मंजूर करण्यात आला.
येत्या काळात यासंबंधीचे ठराव आपापल्या संघटनांत करण्यात येणार आहेत,
अशी ग्वाही पदाधिकाऱ्यांनी दिली.
डी.जे.(D.J.)मुक्ती आंदोलन कायमस्वरूपी हवे यासाठी सर्व वकील संघटना मिळून १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता मोर्चा काढणार आहेत.
महापालिका आयुक्तांना डी.जे.(D.J.)वर कायमस्वरूपी बंदी आणण्याबाबत निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.डी.जे.(D.J.)चा त्रास प्रत्येक समाज घटकाला होतो.
विशेषत: मूळ शहरात राहणारे नागरिक, दुकानदार, व्यापारी तसेच या परिसरात कार्यालये असलेल्या सर्व आस्थापनांचे दोन ते तीन दिवस एका मिरवणुकीसाठी वाया जात आहेत.
मिरवणुकीच्या अगोदर एक ते दोन दिवस मोठमोठे कंटेनर रस्त्यावर लावले जातात. मिरवणुकीच्या दिवशी तर संपूर्ण रस्ता १२ ते १४ तास वाहतुकीसाठी बंद केला जातो.
दुसरा दिवस या परिसरातील स्वच्छता करण्यात जातो. यामुळे शहरातील गावठाण भागात कोणीही राहू इच्छित नाही.
यामुळे शहराला लागलेली डी.जे.(D.J.)ची कीड कायमस्वरूपी घालविणे आवश्यक आहे, असा सूर या बैठकीत निघाला.
या बैठकीला डी.जे. मुक्त सोलापूर कृती समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ धनंजय माने, बार असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब जाधव, महेश आग्रवाल, हेमंतकुमार माळी, बार असोसिएशनचे रियाज शेख, आय.टी.एस.टी.पी.(I.T.S.T.P.)चे अध्यक्ष अक्षय अंदोरे, जॉइंट सेक्रेटरी व्यंकटेश दारना, राजेश बट्टू, संदीप शेंडगे, राजशेखर कोरे, लक्ष्मीकांत गवई, विकास कुलकर्णी आदी वकिलांसह कृती समितीचे कौस्तुभ करवा, असीम सिंदगी प्रियांका पवार व सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार पार्सेकर आदी उपस्थित होते.
न्यायालयात उशिरा पोचण्याचा अनुभव..
बैठकीला उपस्थित असलेले एक ज्येष्ठ विधीज्ञ म्हणाले, की एके दिवशी ११ वाजता मे. न्यायालयासमोर हजर राहणे आवश्यक होते. त्याच हिशेबाने घरातून मे. न्यायालयाकडे गाडी निघाली.
मात्र, छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीसांनी वाहतुकीची दिशा वळविलेली होती. गावातून अरुंद रस्त्याने व बाजारपेठेतील गर्दीतून मे. न्यायालयात पोचण्यास ११.३५ झाल्या. मिरवणुकांना वेळच्या मर्यादा असणे आवश्यक आहे.
१२ ते १४ तास मिरवणुका काढल्याने सातत्याने जनजीवन विस्कळित होत आहे.