सोलापूर

कंपाउंडरची मुलगी बनली डॉक्टर!

Dr Gayatri Maharudra Katte News 

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर :‌ हरिभाई देवकरण प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी डॉ. गायत्री महारुद्र कत्ते हिने बी.एच. एम. एस.‌मेडिकलच्या अंतिम वर्ष परीक्षेत प्रथम श्रेणी गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले.

HTML img Tag Simply Easy Learning

गायत्री हिचे वडील महारुद्र कत्ते अजूनही डॉ. किरण पाटील डॉक्टरांकडे गेली 35 वर्ष कंपाउंडर म्हणून सेवा देत आहेत. तर गायत्रीची आई अंगणवाडी सेविका म्हणून काम करत असून यांची कन्या गायत्री हिने वांगी (ता. द सोलापूर) गावामधून आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेऊन आपले नाव रोशन केले आहे.

सोलापूर येथील महिला होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली असून त्यासाठी संस्थापक विलास हरपाळे यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. तिच्या या यशाबद्दल हरिभाई देवकरण प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्या दीपा फाटक, उपप्राचार्य शांतप्पा कुंभार, डॉ. किरण पाटील (बालरोगतज्ञ), डॉ. सुनिता पाटील, माजी प्राचार्या स्मिता क्षीरसागर, प्रकाश भोईटे, निलेश पाटील, प्रा. सिद्धेश्वर उकळे, सतीश काळे, प्रा. भानुदास बनसोडे, ए. पी. आय.आदिनाथ पाटील, औदुंबर सर्वगोड, ह. दे. प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्यालय प्रमुख रत्नाकर लोंढे आदींचे सहकार्य लाभले. सर्वांनी अभिनंदन करुन तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Back to top button