सामाजिकसोलापूर

डॉक्टर पिता-पुत्रीला मिळाला बहुमान

Dr Milind Shah Dr Naval Shah South Korea Conference News

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : बुसान, साऊथ कोरिया येथे “स्त्री आरोग्यासाठी नवी झेप” या विषयावर होणाऱ्या जागतिक परिषदेमध्ये सोलापूरचे डॉ. मिलिंद शहा व त्यांची कन्या डॉ. नवल शहा यांना भाषणासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. पिता व पुत्री दोघांनाही हा बहुमान एकत्र मिळण्याचे हे सोलापुरातील एकमेव उदाहरण आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

येत्या आठवडयात दि १६ मे २०२४ ते २० मे २०२४ रोजी बुसान, साऊथ कोरिया या देशामध्ये “स्त्री आरोग्यासाठी नवी झेप” या विषयावर आशिया व ओशियाना या देशाची भव्य परिषद होणार आहे. या परिषदेमध्ये आपल्या सोलापुरातील प्रसिध्द स्त्रीरोगतज्ञ डॉ. मिलिंद शहा व डॉ. नवल शहा यांना व्याख्यानासाठी खास आमंत्रित करण्यात आले आहे.

कधी कधी गरोदरपणात बाळामध्ये व्यंग आढळल्यास काय उपाययोजना करावी व त्याचे समुपदेशन कसे करावे यावर जगभरातील स्त्रीरोगतज्ञांना व बालरोगतज्ञांना डॉ. मिलिंद शहा या परिषदेत मार्गदर्शन करतील. तसेच “गर्भपिंशवीतील आंतरस्तर कसा मजबूत करावा” या डॉ. नवल शहा या शोधनिबंध सादर करणार आहेत.

डॉ. मिलिंद शहा सोलापूर व मुंबई येथे गेली जवळजवळ तीस वर्षे कार्यरत आहेत. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये ते आपली सेवा देतात. त्याच बरोबर फॉग्सी, आयसोपार्ब, आय.एम.ए. अशा विविध संस्थांवर अध्यक्ष व विविध पदाधिकारी म्हणून त्यांनी कामे केले आहे. आजवर जवळजवळ तीस देशांमध्ये त्यांनी स्त्रीरोग शास्त्रावरील विविध विषयावर बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

यामध्ये अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, चिली, फ्रान्स, स्वित्झर्लंड, जपान, थायलँड, साऊथ आफ्रिका, चीन, पोर्तुगाल, श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तान, आफगाणिस्तान, बांगलादेश, सिंगापूर, मलेशिया, व्हिएतनाम, तैवान, इंडोनेशिया, मॉरिशस, फिलिपाईन्स, दुबई, सार्बिया, ब्राझील, साऊथ कोरियाव, पेरु इत्यादी देशांचा समावेश आहे.

डॉ. नवल शहा या सोलापूरातील उदयोन्मुख प्रसिध्द स्त्रीरोगतज्ञ असून त्यांनी या विषयातील विविध पदव्या ग्रहण केल्या आहेत. देशभरात व विदेशात त्यांचे शोधनिबंध प्रसिध्द झाले आहेत. सर्बिया येथे झालेल्या त्यांच्या शोध निबंधास उत्कृष्ट शोधनिबंधाचे पारितोषिक मिळाले आहे.

सोलापूरला मिळालेल्या या बहुमानामुळे सर्व सोलापूर वासियांमध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण आहे.

Related Articles

Back to top button