मुलाला दोन इंजेक्शन दिले अन्..
Dr Navin Totala Solapur Crime News
सोलापूर : उपचारामध्ये हलगर्जीपणा करून सतरा वर्षाच्या मुलाचा मृत्यू होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी डॉ. नवीन तोतला याच्यावर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेच्या दोन वर्षानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.
ही घटना दि २३/०८/२०२२ रोजी डॉ. तोतला मल्टी स्पेशॉलिटी हॉस्पीटल सोलापूर येथे घडली आहे. या प्रकरणात रहिमतबी हुसेनसाब केन्नीवाले (वय-५० वर्षे, रा- मुपो आळंद ता. आळंद जि. गुलबर्गा) यांनी फिर्याद दिली आहे. डॉ. नवीन सुभाष तोतला (रा. तोतला मल्टी स्पेशॉलिटी हॉस्पीटल सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे. जिलानी हुसेनसाब केन्नीवाले (वय-१७) असे मयत मुलाचे नाव आहे.
यात हकिकत अशी की, यातील फिर्यादी केन्नीवालेचा मुलगा जिलानी याने दोन वर्षापुर्वी ऍसिड प्राशन केले होते. त्यामुळे त्याला उपचारासाठी अग्रवाल नर्सिंग होम सोलापूर येथे उपचारासाठी दाखल केले होते. हॉस्पीटलमधील डॉ नवीन तोतला हे त्यास उपचारासाठी पाहणी करीत होते. तेथे उपचार घेतल्यानंतर फिर्यादीच्या मुलाची तब्येत सुधारली होती. त्यानंतर अग्रवाल नर्सिंग होम सोलापूर येथील डॉक्टारांनी डिस्चार्ज दिला. त्यानंतर फिर्यादी ही मुलास घरी गेवून गेली. त्यानंतर दि २३/०८/२०२२ रोजी फिर्यादी व मुलगा यातील मयत हे १५ दिवसांनी डॉ अग्रवाल नर्सिंग होम येथे चेकअपसाठी आले. त्यावेळी डॉ अग्रवाल यांनी तुम्ही डॉ तोतलाकडे जावा तेच उपचार करतील असे सांगितल्याने फिर्यादी व मुलगा यातील मयत हे तोतला मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलकडे गेले. तेथे डॉ तोतला यांना फिर्यादीच्या मुलाला खालेले पचत नाही उलटी होत आहे असे सांगितल्याने यातील मयत जिलानी यास डॉ. तोतला यांनी एक इंजेक्शन दिले. त्यावेळी जिलानी हा शुध्दीवरच होता. त्यानंतर थोड्या वेळाने डॉ. तोतला यांनी फिर्यादीच्या मुलगा जिलानी याच्या तोंडात नळी घातली. त्यावेळी त्यास त्रास होवू लागल्याने तो हालचाल करू लागला. त्यावेळी डॉ. तोतला यांनी त्यास पुन्हा एक इंजेक्शन दिले. त्यावेळी मुलगा जिलानी हा बेशुध्द झाला. त्यानंतर डॉ तोतला यांनी मुलगा जिलानी यांच्या तोडांतून नळी बाहेर काढून त्यास उचलून बाहेर आणले व अॅम्ब्युलन्समध्ये घालून आधार हॉस्पीटल येथे पाठवून दिले. तेथे गेल्यावर काहीच मिनीटांनी तेथील डॉक्टरांनी मुलगा जिलानी यांचे निधन झाले आहे असे सांगितले.
आरोपी डॉ तोतला यांनी फिर्यादीच्या परवानगीशिवाय फिर्यादीचा मुलगा यातील मयत यास दोन इंजेक्शन देवून फिर्यादीचा मुलगा जिलानी (मयत) यास निष्काळजीपणाने उपचार करून त्यांचे मृत्युस कारणीभूत ठरला आहे.
पोलीस उपनिरीक्षक संजीवनी व्हट्टे तपास करीत आहेत.