डॉ. सचिन ओंबासे सोलापूर महापालिकेचे नवे आयुक्त

Dr Sachin Ombase Commissioner Solapur Municipal Corporation News

सोलापूर : धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांची सोलापूर महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.

शितल तेली उगले यांची बदली झाली आहे. त्यांची बदली कोणत्या पदावर झाली याची माहिती अद्याप उपलब्ध झाली नाही. डॉ. सचिन ओंबासे हे धाराशिव जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी वर्धा येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.
गेल्या दोन वर्षापासून डॉ. सचिन ओंबासे यांनी धाराशिवचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. सोलापूर महापालिका आयुक्त पदावर त्यांची मंगळवारी नियुक्ती करण्यात आली. याबाबतचा आदेश निघाला आहे.
कोण आहेत डॉ. सचिन ओंबासे?
डॉ. सचिन ओंबासे IAS Sachin Ombase यांचे शालेय शिक्षण दहिवडी (सातारा), मंचर (पुणे) या ठिकाणी झाले. त्यानंतर त्यांनी पुणे येथून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. भारतीय प्रशासकीय सेवेची म्हणजेच यूपीएससी 2011 ची परीक्षा देऊन ते आयआरएस म्हणजेच भारतीय महसूल सेवेमध्ये दाखल झाले. सहाय्यक आयुक्त म्हणून तीन वर्षे सेवा बजावली. 2014 साली पुन्हा एकदा भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा देऊन ते आयपीएस म्हणेज भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले. आठ महिने सेवा बजावली. आणि मग त्यानंतर 2015 मध्ये पुन्हा एकदा यूपीएससी परीक्षा देऊन ते आयएएस झाले. प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर वर्धा या ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी कर्तव्य पार पाडले. वर्धा येथून त्यांची बदली धाराशिव जिल्हाधिकारी म्हणून झाली. आता डॉ. सचिन ओंबासे हे सोलापूर महापालिकेचे आयुक्त म्हणून येणार आहेत.