धुक्यात हरवलेल्या आडराई जंगलात उत्साही भटकंती
eco friendly club aadrai junlge trek 2024
इको फ्रेंडली क्लबचा उपक्रम; आडराई जंगल, ऐतिहासिक नाणेघाट, लेण्याद्री परिसरात ट्रेकिंग
सोलापूर : निसर्ग पर्यटन वाढावे यासाठी प्रयत्नशील असलेल्या इको फ्रेंडली क्लबच्यावतीने (Eco Friendly Club) महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा आडराई जंगलात भटकंतीचे (Aadrai Jungle Trek) आयोजन करण्यात आले होते. सोबतच जुन्नर परिसरातील नाणेघाट आणि अष्टविनायक गणपतींपैकी एक असलेल्या लेण्याद्री येथे भटकंती करण्यात आली. दोन दिवसाच्या निसर्ग भटकंतीमध्ये सर्वांनी स्वर्गीय अनुभूती घेतली. पावसात, धबधब्याखाली भिजून सारे चिंब झाले होते.
12 जुलै रोजी रात्री सोलापुरातून प्रवासाला सुरुवात झाली. 13 जुलै रोजी सकाळी सर्व निसर्गप्रेमी जुन्नर परिसरातील माजी सैनिक सुरेश भोर यांच्या साई समता मंगल कार्यालय (Sai Samata Lawn) येथे दाखल झाले. साई समता मंगल कार्यालय आणि लॉजिंग येथे सर्वांच्या फ्रेश होण्याची आणि चहा नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती.
त्यानंतर बस प्रवास करत सर्व निसर्गप्रेमी आडराई जंगल परिसरातील खिरेश्वर (Khireshwar) गावात पोचले. सर्व सूचना दिल्यानंतर स्थानिक गावकरी भाऊ मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेकिंगला सुरुवात झाली.
जंगलात प्रवेश केल्यानंतर काही वेळातच काळू धबधबा (Kalu Waterfall) पाहिला.
धुक्यात हरवलेले जंगल, चिखलाने मळलेली पायवाट, उंचच उंच डोंगर कडे, डोंगरावरून कोसळणारे धबधबे पाहत घनदाट जंगलातून वाट काढत सर्व निसर्गप्रेमींनी आडराई जंगलात भटकंती केली. सर्वांनी दाट जंगलातील पाऊस अनुभवला आणि धबधब्यात मनसोक्त भिजण्याचाही आनंद घेतला. काहींनी तर धबधब्याच्या शेजारी उभे राहून गरमागरम भाजी आणि चहाचा आस्वाद घेतला.
परत येताना खिरेश्वर परिसरातील प्राचीन आणि ऐतिहासिक नागेश्वर मंदीरालाही भेट दिली.
खिरेश्वर परिसरातील बाळू मेमाणे (Hotel Bhushan – Balu Memane) यांच्या हॉटेल भूषण येथे मस्त गावरान जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर बस प्रवास करत सर्वजण मुक्कामाच्या ठिकाणी पोचले.
सायंकाळी साई श्रद्धा मंगल कार्यालय येथे इतिहास अभ्यासक, पर्यावरणप्रेमी, माजी सैनिक रमेश खरमाळे (Ramesh Kharmale) यांनी सर्वांसोबत संवाद साधला. पर्यावरण संवर्धन या अनुषंगाने सर्वांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. माजी सैनिक सुरेश भोर यांनीही मार्गदर्शन करून सुंदर गाणी सादर केली.
14 जुलै रोजी सकाळी चहा – नाश्ता झाल्यानंतर बस प्रवास करत सर्वजण ऐतिहासिक आणि प्राचीन अश्या नाणेघाट (Naneghat) परिसरात पोचले.
नाणेघाटातील ऐतिहासिक रांजण, प्राचीन लेण्या, शिलालेख पाहून सर्वाना आनंद झाला. त्यानंतर सर्वांनी नाणेघाटाचा रिवर्स वॉटरफॉल पहिला.
स्थानिक गावकरी चिंतामण कोकणे यांच्या हॉटेल रानमळा येथे सर्वांच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
दुपारच्या जेवणानंतर निसर्गप्रेमींचा ताफा लेण्याद्री येथे पोचला. अष्टविनायक गणपतींपैकी एक असलेल्या लेण्याद्री येथील गिरिजात्मज (Lenyadri Ganpati) गणपतीचे सर्वांनी दर्शन घेतले.
त्यानंतर लेण्याद्री येथील संजय वाणी यांच्या हॉटेल गिरिजात्मज येथे सर्वांचे रात्रीचे जेवण झाले. जेवणानंतर सर्वांनी भरपूर डान्स करून ट्रेकचा आनंद द्विगुणित केला.
दोन दिवसाची मस्त भटकंती करून सर्व निसर्गप्रेमी 15 जुलै रोजी सोलापुरात दाखल झाले.
इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक परशुराम कोकणे, समन्वयक सटवाजी (अजित) कोकणे, संतोषकुमार तडवळ यांनी भटकंतीचे नेतृत्व केले.
आडराई जंगल भटकंतीमध्ये गंगुबाई कोकणे, सरस्वती कोकणे, पूजा कोकणे, आसावरी सुतार, ॲड सतीश गाजूल, ॲड प्रशांत म्हेत्रस, ॲड वाहिद पटेल, ॲड विनोदकुमार जमादार, नरेश कणकी, सुधाकर लोळगे, सुभाष चव्हाण, वैद्य प्रवीण बिरगे, सहिषा चिपडे, अनिश घनाते, सानिका घनाते, स्नेहा माळी, गौरी कुलकर्णी, शुभम काडगावकर, शशिकला गायकवाड, संजय टोळे, डॉ. योजना टोळे, अतुल धुमाळ, निर्मला धुमाळ, डॉ. महेश आगलावे, डॉ. हर्षदा आगलावे, राही महेश आगलावे, माही महेश आगलावे, आदित्य पावडशेट्टी, कार्तिक वाघोले, निहाल लोंढे, गणेश सातलिंग भालवणे, पूर्वा देशमुख, शारदा महिंद्रकर, मनीषा इंदापूरकर, सारिका दमदाडे, संतोषी शिंदे, अनिता शेळके-सराटे, डॉ. शुभांगी कनकी, सृष्टी कनकी, रूपा जकनाईक, पूजा सैंदाणे आचलकर, सागर सुभाष आचलकर, रुषिकेश नितीन लंगोटे यांचा सहभाग होता.
सोलापूरची शेंगा चटणी अन् टॉवेल भेट!
दोन दिवसाच्या निसर्गभ्रमंतीमध्ये इको फ्रेंडली क्लबला सहकार्य करणाऱ्या खानापूर येथील साई समता मंगल कार्यालयाचे संचालक माजी सैनिक सुरेश भोर, व्यवस्थापक भरत घोडे, श्री योगेश, माजी सैनिक रमेश खरमाळे, लेण्याद्री येथील हॉटेल गिरीजात्मजचे संचालक संजय वाणी यांना सोलापूरची प्रसिद्ध शेंगा चटणी तसेच टॉवेल भेट म्हणून देण्यात आले.
चडचणकर ट्रॅव्हल्सचे संचालक जगदीश चडचणकर, सोमनाथ चडचणकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालक समीर मस्के, सहाय्यक अतीश तांबे यांचे सहकार्य लाभले.