सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन

ट्रेकर्सची पंढरी हरिश्चंद्रगडावर नाईट ट्रेक!

On: April 22, 2025 12:41 PM
Follow Us:
HTML img Tag Simply Easy Learning

eco friendly club harishchandragad night trek

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : इको फ्रेंडली क्लबच्या (Eco Friendly Club) माध्यमातून सोलापूर, पंढरपूर आणि नातेपुते येथील निसर्गप्रेमींनी ट्रेकर्सची पंढरी असलेल्या हरिश्चंद्रगडावर नाईट ट्रेक (Harishchandragad Night Trek) करून निसर्ग भटकंतीचा आनंद लुटला.

HTML img Tag Simply Easy Learning

सर्व निसर्गप्रेमी शनिवारी सकाळी अकोले येथील मातोश्री लॉन्स (Matoshri Lawns Akole) या ठिकाणी पोचले. फ्रेश झाल्यानंतर सर्वजण अकोले परिसरातील प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिर (Shri Siddheshwar Temple, Akole) दर्शनासाठी रवाना झाले.

सर्वांनी प्राचीन आणि ऐतिहासिक श्री. सिद्धेश्वर मंदिराची पाहणी केली. तेराव्या शतकामध्ये या मंदिराची उभारणी झाली असून अनेक वर्षे हे मंदिर मातीमध्ये गाढले गेले होते. 1780 साली मंदिराचा शोध लागला. मंदिरावरील शिल्पकला पाहण्यासारखी आहे.

Next Trip :

सिद्धेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन सर्वजण अकोले तालुक्यातील प्रसिद्ध अगस्त्य ऋषी मठ (Agastya Rushi Math, Akole) या ठिकाणी पोचले. या ठिकाणी श्रीराम आणि अगस्त्य ऋषींची भेट झाली होती.

त्यानंतर सर्वजण बस प्रवास करत प्रवरा नदीजवळ पोचले. नदीच्या पाण्यात सर्वांनी मस्तपैकी धमाल केली.

मातोश्री लॉन्स येथे दुपारचे जेवण केल्यानंतर तासाभराचा प्रवास करत सायंकाळी हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याला असलेल्या पाचनाई गाव गाठले. नाईट ट्रेकिंगला सुरुवात झाली. थंड हवेचा आनंद घेत टॉर्चच्या प्रकाशात सर्वजण दोन तासात हरिश्चंद्रगडावर पोचले.

रात्रीच्या जेवणानंतर टेंटमध्ये मुक्काम केला.

रविवारी पहाटे लवकर उठून सर्वजण फ्रेश झाले. सूर्योदयापूर्वी सर्व ट्रेकर्सनी तारामती शिखर गाठले. उंचावरून दिसणारे निसर्ग सौंदर्य पाहून सर्वजण आनंदून गेले. छत्रपती शिवाजी महाराज की जय.., वंदे मातरम्.., भारत माता की जय.. आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या.

तारामती शिखरावरून कोकणकड्याच्या बाजूने खाली उतरल्यानंतर चहा आणि नाश्त्याचा आस्वाद घेतला.

त्यांनंतर हरिश्चंद्रेश्वर मंदिर, पुष्करणी, केदारेश्वर लेणी, गणेश गुहा परिसराची पाहणी करण्यात आली.

हरिश्चंद्रगड समुद्र सपाटीपासून 4665 फूट उंचीवर असून ट्रेकर्सची पंढरी म्हणून ओळखले जाते.

पाचनाई गावातील गाईड किरण भरमाल यांच्या हॉटेल सह्याद्री ट्रेकर्स येथे मुक्कामाची, चहा-नाष्ट्याची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.

दुपारचे जेवण करून सर्वजण सुरक्षितपणे ट्रेकिंग करत खाली उतरले. बस प्रवास करत पुन्हा अकोले येथे पोचले.

त्यानंतर सर्वांनी अकोले येथील श्री गंगाधरेश्वर मंदिराला भेट दिली.

मातोश्री लॉन्सचे संचालक सुनील धुमाळ आणि अनिल धुमाळ यांनी सर्व निसर्गप्रेमींसाठी फ्रेश होण्याची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था केली होती.

सोलापूर येथून प्रवासाकरिता चडचणकर ट्रॅव्हल्स संचालक जगदीश चडचणकर यांच्या मार्गदर्शनाखाली बस चालक सुधीर शिंदे, श्री. जमादार आणि सहाय्यक प्रथमेश यांचे सहकार्य लाभले.

इको फ्रेंडली क्लब’कडून प्रेमाची सोलापुरी चादर आणि वही-पेनाची भेट!

इको फ्रेंडली क्लबच्या सदस्यांनी हरिचंद्र भटकंती वेळी कोणत्याही प्रकारचा कचरा न करता निसर्ग नियमांचे पालन केले. इको फ्रेंडली सदस्यांच्यावतीने पाचनाई गावातील गाईड, हॉटेल सह्याद्रीचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य किरण भरमाल यांना प्रेमाची सोलापुरी चादर आणि गावातील विद्यार्थ्यांसाठी वही-पेनाची भेट देण्यात आली.

इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक परशुराम कोकणे, समन्वयक सटवाजी उर्फ अजित कोकणे, सदस्य संतोषकुमार तडवळ, संजय टोळे यांनी या भटकंतीचे नेतृत्व केले.

या भटकंतीमध्ये सिद्राम मानेकरी, नितीनकुमार नारायणे, त्रिमूर्ती औदुंबर गुंडगे, सुरेश नारायणकर, हेतल गौतम छाजेर, मुग्धा ओंकार दाते, रमा ओंकार दाते, पूजा सैंदाणे-आचलकर, सागर आचलकर, अमोल कुलकर्णी, शिल्पा घोगडे, प्रसाद घोडके, सुष्मिता अग्रवाल, ईश्वर बुरा, समृद्धी सूर्यकांत डोंगरे, गौरी माने, गार्गी कुलकर्णी, मैत्रेयी महेश पात्रुडकर, गौरी खिस्ते, स्वाती मोरे, दर्शन जाधव, वैद्य प्रवीण बिरगे, अनुराधा जाधव, सायली माळवदकर, अपूर्वा कुलकर्णी, अभिराम कुलकर्णी, शोभा तडलगी – मानेदेशमुख, साक्षी मानेदेशमुख, रजनी करंजकर, वैष्णवी होलेपाटील, रणजीत होलेपाटील, रश्मी पात्रुडकर, गंगुबाई कोकणे, आराध्या कोकणे, भाऊसाहेब गवळी, श्रीगणेश लोणी, सुमित मिस्किन आदी सदस्य सहभागी झाले होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe Youtube Channel

Join Now