सर्वोच्च कळसुबाई शिखरावर मिळाली ऊर्जा!
eco friendly club kalsubai trek 2024
सोलापूर : निसर्ग पर्यटन वाढावे यासाठी प्रयत्नशील असलेल्या इको फ्रेंडली क्लबच्यावतीने (Eco Friendly Club) महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाई शिखरावर ट्रेकिंगचे आयोजन करण्यात आले होते. सोबतच निसर्गरम्य अशा भंडारदरा जलाशय (Bhandardara Dam), वसुंधरा धबधबा (Vasundhara Waterfall) आणि प्राचीन अमृतेश्वर मंदिर (Amruteshwar Temple, Ratanvadi) परिसरात भटकंती करण्यात आली. या उपक्रमात सोलापूर, लातूर, धाराशिव आणि पुणे येथील निसर्गप्रेमी सहभागी झाले होते.
विविध क्षेत्रातील मंडळींनी या उपक्रमात सहभाग नोंदविला. 18 ऑक्टोबर रोजी सर्व निसर्गप्रेमी चडचणकर ट्रॅव्हल्सच्या (Chadchankar Travels Solapur) लक्झरी बसमधुन अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदारा जलाशयाच्या दिशेने रवाना झाले.
19 ऑक्टोबर रोजी पहाटे सर्वजण अकोले येथील संतोष नवले यांच्या साई लॉन (Sai Lawn Akole) या ठिकाणी पोचले. फ्रेश झाल्यानंतर चहा – नाश्ता केला. पुढील प्रवासाला निघण्याआधी सर्वांना सूचना देण्यात आल्या.
उंचचउंच शिखरे आणि भंडारदरा जलाशयाचे विस्तीर्ण रूप पाहात सर्व निसर्गप्रेमी घाटघर येथील कोकणकडा परिसरात पोचले. सर्वांनी काही वेळ भंडारदरा जलाशयाच्या पाण्यात उतरून आनंद लुटला.
त्यानंतर सर्वजण साम्रद गावात दाखल झाले. दुपारच्या जेवणानंतर रतनवाडी परिसरातील वसुंधरा धबधबा आणि प्राचीन अमृतेश्वर मंदिर पाहण्यासाठी मार्गस्थ झाले. प्रवासात पाऊस सुरु झाला आणि सर्वजण आनंदून गेले. सर्वांनी वसुंधरा धबधब्याला भेट दिली.
त्यानंतर रतनवाडी येथील प्राचीन अमृतेश्वर मंदिरास भेट दिली. तर लातूर येथून आलेल्या सदस्यांनी सांदण दरी परिसरात भटकंती केली.
सायंकाळच्या सुमारास पुन्हा सर्व ट्रेकर्स साम्रद गावामध्ये पोहोचले. साम्रद गावातील गाईड अतुल आणि राहुल बांडे यांच्याकडे मुक्कामाची छान व्यवस्था करण्यात आली होती. गावरान जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर सर्वानी आराम केला.
20 ऑक्टोबर 2024 रोजी पहाटे लवकर उठून सर्वजण फ्रेश झाले. चहा – नाश्तानंतर सर्वोच्च कळसूबाई शिखराच्या ट्रेकिंगसाठी रवाना झाले. पांजरे गावातून ट्रेकिंगला उत्साहात सुरुवात झाली.
भटकंती करत असताना सभोवताली दिसणारा निसर्ग पाहून सर्वांना आनंद झाला. उंचावरून दिसणारे भंडारदरा जलाशय मनमोहीत करणारे होते.
वन विभागाने बसविलेल्या लोखंडी शिड्यांचा आधार घेत सर्वजण कळसुबाई शिखराजवळ पोचले. या ट्रेक दरम्यान अनेकांनी स्वतःची शारीरिक क्षमता तपासून पाहिली.
कळसुबाई भटकंतीमध्ये लातूरवरून सहभागी झालेले सर्व डॉक्टर सदस्य.
महाराष्ट्रातील सर्वात उंच ठिकाणी पोहोचून सर्वजण आनंदून गेले. छत्रपती शिवरायांचा जयघोष याठिकाणी करण्यात आला. सह्याद्रीतल्या खडतर वाटेवरून सर्वोच्च ठिकाणी पोचून अनेकांना गहिवरून आले.
कळसूबाई देवीला आणि निसर्गाला सर्वजण नतमस्तक झाले. बारी गावाच्या दिशेने उतरायला सुरुवात केली. या भटकंतीवेळी स्थानिक गाईड अतुल बांडे आणि दीपक बांडे यांचे सहकार्य महत्वाचे ठरले.
अकोले येथील साई लॉनवर संतोष नवले आणि त्यांच्या टीमने रात्रीच्या जेवणाची छान व्यवस्था केली होती. निसर्गरम्य अशा अकोले तालुक्यात पुन्हा येवू असा शब्द देवून सर्वजण परतीच्या प्रवासाला निघाले.
इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक, वसुंधरा मित्र परशुराम कोकणे, समन्वयक सटवाजी उर्फ अजित कोकणे, संतोषकुमार तडवळ, लातूरचे समन्वयक डॉ. उत्तम देशमाने यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च कळसूबाई शिखर भटकंतीमध्ये सोलापूर येथून पूजा कोकणे, गंगुबाई कोकणे, डॉ.प्रविण बिरगे, शेखर दिवसे, आदित्य पावडशेट्टी, श्लोक सुरवसे, शिवकुमार राऊतराव, प्रथमेश कोळी, निर्मलकुमार आगरखेड, अवधूत गायकवाड, ज्योती अरविंद गायकवाड, राजे मोटर्सचे संचालक अतुल धुमाळ, निर्मला धुमाळ, सई धुमाळ, सार्थक धुमाळ, महेश हॉस्पिटलचे संचालक डॉ. महेश आगलावे, डॉ. हर्षदा आगलावे, ॲड. साधना काकडे, सुहासिनी सखाराम आवटे, अनुराधा श्रीनिवास जेवळीकर, सुरभी धनंजय जेवळीकर, चैतन्या सुहास मेटे, सौ. रजनी संजय करंजकर, सौ. अरुणा दिलीप कुलकर्णी, सौ.कविता प्रसाद देवस्थळी, अमोल मते, श्रीनिवास गोसकी, आशिष इंगळे, गिरीश प्रभाकर घोगले, सौ. उमा गिरीश घोगले, इम्तियाज बाशा कलादगी, मैत्रेयी पात्रुडकर, रश्मी पात्रुडकर, संगमनाथ नागोजी, सुनील राठोड, राजेंद्र आळसंगे, भूमी अभिलेख कार्यालयातील वरिष्ठ कर्मचारी मकरंद काडगावकर, मिनाक्षी वर्धमान, ओम गायकवाड, अजिंक्य जाधव, आदित्य अमर धुमाळ पुणे येथून दयानंद भोळे आणि लातूर येथून डॉ अक्षय गेल्डा, डॉ. विजयकुमार कर्पे, डॉ. अक्षय गोमारे, डॉ. गुंडेराव कुलकर्णी, डॉ. श्रीप्रसाद आलुरे, डॉ. शैलेश पडगीलवार, डॉ. उत्तम देशमाने, डॉ. राहुल लातुरिया, डॉ. मुकेश अराडले, डॉ. सफल्या कडताने, डॉ. आनंद आंबेकर, डॉ. सचिन बासुदे. डॉ श्रीराम बनसोडे, डॉ. सचिन अभंगे, सावन चांडक यांनी सहभाग नोंदविला.
सर्वोच्च कळसूबाई शिखर, सांदण दरी आणि भंडारदरा परिसरातील भटकंती अधिक आनंददायी होण्यासाठी, सह्याद्रीतल्या घाट वाटांमधून प्रवास करण्यासाठी चडचणकर ट्रॅव्हल्सचे संचालक मृगेंद्र चडचणकर, सोमनाथ चडचणकर, जगदीश चडचणकर, चालक समीर मस्के, सहाय्यक अतिष तांबे यांचे सहकार्य लाभले.
ज्येष्ठांचा उत्साही सहभाग
सर्वोच्च कळसूबाई शिखर ट्रेकिंगमध्ये तरुणांसह ज्येष्ठ सदस्यांनीही उत्साहाने सहभाग नोंदवला. 61 वर्षीय ॲड. साधना काकडे यांनी अतिशय जिद्दीने महाराष्ट्राच्या सर्वोच्च ठिकाणी तिरंगा फडकविला. त्यांना या वयात ट्रेकिंग जमेल का? अशी शंका सर्वांना असतानाही ॲड. साधना काकडे यांनी स्वप्नपूर्ती केली. सोबतच ज्येष्ठ सदस्या रजनी करंजकर (वय 61), अरुणा कुलकर्णी (वय 61), कविता देवस्थळी (वय 60) यांनीही वयाला मागे टाकत इच्छाशक्तीने कळसुबाई शिखर पादाक्रांत केले. निवृत्त अधिकारी गिरीश घोगले (वय 68) आणि सौ. उमा घोगले (वय 58) या दोघांनी कळसुबाई शिखराचे काही अंतर चालून पायथ्याला भटकंती करण्याचा निर्णय घेतला.
‘खरोखरच विश्वास बसत नाही, मी कळसूबाई शिखरावर जाऊन आले! सर्व श्रेय सर्व केवळ ईश्वराला आणि इको फ्रेंडली क्लबला देते. मी अजूनही मनाने कळसूबाई शिखरावरुन खाली उतरलेच नाही. पायी चालणारा महत्वाचा नसतो. तर त्या पायात प्रेरणा देऊन चालण्याचं बळ निर्माण करणारा महत्वाचा असतो.
– ॲड. साधना काकडे,
जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर