पर्यावरण / पर्यटन

वासोटा भटकंतीने जंगल अन् इतिहासाचा अनुभव!

इको फ्रेंडली क्लबचा उपक्रम

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : निसर्ग पर्यटन वाढावे यासाठी प्रयत्नशील असलेल्या इको फ्रेंडली क्लबच्यावतीने (Eco Friendly Club) वासोटा जंगल ट्रेकिंग (Vasota Junle Trek) तसेच औंध संस्थानचे संग्रहालय आणि यमाई देवी मंदिर भटकंतीचे आयोजन करण्यात आले होते. निसर्गसंपन्न अशा कोयना परिसरातील शिवसागर जलाशय (Shivsagar) आणि वासोटा परिसरात भटकंतीने सर्वजण आनंदून गेले. या उपक्रमात जवळपास 50 निसर्गप्रेमी सहभागी झाले होते.

HTML img Tag Simply Easy Learning

21 फेब्रुवारी रोजी सर्व निसर्गप्रेमी चडचणकर ट्रॅव्हल्सच्या (Chadchankar Travels) लक्झरी बसमधुन सातारा येथील निसर्गरम्य अशा कोयना जलाशयाच्या दिशेने रवाना झाले.

22 फेब्रुवारी रोजी पहाटे सर्वजण सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मौजे शेंबडी या गावामधील किसान साळुंखे यांच्या आरोही टेन्ट हाऊस (Arohi Tent House) याठिकाणी पोचले. पहाटे लवकर सर्वांनी फ्रेश होऊन चहा – नाष्टा केला. सकाळच्या सोनेरी किरणात दिसणारा कोयना जलाशय आणि सह्याद्रीची डोंगररांग पाहून सर्वजण भारावून गेले.

दोन्ही बाजूस असणारी सह्याद्रीची डोंगररांग आणि मध्ये असणाऱ्या शिवसागर जलाशयातून बोटिंग करत वासोटा किल्ल्याकडे सर्वांचा प्रवास सुरु झाला.

बोटीने प्रवास करत असताना उंचचउंच शिखरे आणि शिवसागर जलाशयाचे विस्तीर्ण रूप पाहात निसर्गाचे दर्शन केले. बोटिंग करत वासोटा येथील वनविभागाच्या सह्याद्री व्याघ्र राखीव येथील चेक पोस्टपर्यंत गाठले.

घनदाट असलेल्या कोयना अभ्यारणातून (Koyana koyna Wildlife Sanctuary) वासोटा ट्रेक सुरु झाला.

सुमारे दीड ते दोन जंगलातून ट्रेकिंग करत सर्वजण वासोटा किल्ल्यावर पोचले. वासोटा किल्ल्यावर पोचल्यावर छत्रपती शिवाजी महाराज की जय…, भारत माता की जय.. या घोषणा देत आपला आनंद व्यक्त केला. त्यानंतर सर्वांनी सोबत आणलेला डबा खाल्ला.

दुपारच्या जेवणानंतर सर्वांनी वासोटा किल्ल्याची भटकंती केली. गडाच्या टोकावरून समोर दिसणारे शिवसागर जलाशयाचे विहंगम दृश्य व कोयनेचे अभयारण्य पाहताना सर्वांना आनंद झाला. किल्ल्यावर असलेले मारुती मंदिर, वाड्याचे अवशेष, महादेव मंदिर, नागेश्वर सुळक्याचे दर्शन व दूरवर पसरलेल्या डोंगर-दऱ्या पाहताना वेगळाच आनंद मिळाला.

संपूर्ण किल्ला फिरून झाल्यानंतर सर्वांचा सुरक्षितपणे वासोटा किल्ला उतरून परत बोटीने परतीचा प्रवास सुरु झाला. सायंकाळी शिवसागर जलाशय परिसरात सर्वांनी सूर्यास्ताचा आनंद घेतला.

रात्री जेवणानंतर शिवसागर जलाशयाच्या शेजारी मस्त गाण्याची मैफिल रंगली, सोबतच शेकोटी आणि डान्सही झाला.

23 फेब्रुवारी रोजी सकाळी चहा नाष्टा झाल्यानंतर इको फ्रेंडली क्लबच्या सदस्यांनी आरोही टेन्ट हाऊसचा निरोप घेतला.

शेंबडी गावातील दत्त मंदिरास भेट दिल्यानंतर बसने प्रवास करत सर्वजण दुपारच्या जेवणासाठी वाडा चिरेबंदी हॉटेलला पोचले.

दुपारच्या जेवणानंतर सर्वजण औंध येथे पोचले. तेथील संग्रहालयाला सर्वांनी भेट दिली. संग्रहालयात असलेल्या सर्व वस्तू, चित्रे ऐतिहासिक वारसा पाहून सर्वजण आनंदून गेले.

त्यानंतर सर्वांनी औंध येथील यमाई देवी मंदिरास भेट दिली. त्याठिकाणी इतिहासप्रेमी सीमंतिनी चाफळकर मॅडम आणि स्थानिक गावकरी अंबादास बुटे यांनी सर्वांना औंध परिसर आणि इतिहासाची माहिती दिली.

मंदिर पाहून झाल्यानंतर इको फ्रेंडली क्लबचे सदस्य गोंदवले येथे पोहोचले. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मठात दर्शन घेतले. त्यानंतर हॉटेल विराट येथे सर्वांनी रात्रीचे जेवण केले.

इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक, वसुंधरा मित्र परशुराम कोकणे, समन्वय सटवाजी (अजित) कोकणे, समन्वयक महेंद्र राजे, संतोष तडवळ यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या निसर्ग भ्रमंतीमध्ये गंगुबाई कोकणे, पूजा कोकणे, सरस्वती कोकणे, आराध्या कोकणे, दिपक कंदलगावकर, सुधीर गावडे, रोहित बलसुरे, रिधान बालसुरे, विनोद कनकी, आरुष अडकी, अर्जुन देशपती, बिराजदार जयकुमार, अमेय श्रीरंग केत, बिराजदार यशश्री, अवनी अमेय केत, रमा सांजेकर, श्रध्दा सांजेकर, सीमंतिनी चाफळकर, मनीषा कोकाटे, सम्यक बनसोडे, मयूर सुतार, साईनाथ मेडपल्ली, प्रणव कंदीकटला, अपूर्वा कंदीकटला, शिवकुमार राऊतराव, ॲड साधना काकडे, साक्षी घटे, पूनम पवार, शिरीष दंतकाळे. अपर्णा काटकर, कस्तुरी स्वामी, वीरभद्र स्वामी, पूजा स्वामी, केतकी स्वामी, सुरेश नारायणकर, नितीन नारायणे, ईश्वर बुरा, श्रद्धा धनशेट्टी, संजय टोळे, डॉ. योजना टोळे, दर्शन जाधव, देवाशिष शहा, धीरज उकरंडे, शिल्पा माळी, साची राजेश माळी, अंकिता राजे, शर्मिला करपे, श्रूणोती करपे आदी सदस्य सहभागी झाले होते.

ही निसर्ग भ्रमंती आनंददायी होण्यासाठी चडचणकर ट्रॅव्हल्सचे संचालक सोमनाथ चडचणकर, बस चालक समीर मस्के, सहाय्यक आतीश तांबे यांचे सहकार्य लाभले.

#EoFriendlyClub #Vasota #VasotaFort #VasotaTrek #Trekking #Maharashtra #MaharashtraTourism #Solapur #Satara #Camping #Boting #JungleTrek

Related Articles

Back to top button