पर्यावरण / पर्यटन

सोलापूरकरांनी अनुभवली गार डोंगराची हवा!

Eco Friendly Club Wai Raireshwar Trip

HTML img Tag Simply Easy Learning

वाई परिसर आणि रायरेश्वर पठारावर भटकंती; इको फ्रेंडली क्लबचा उपक्रम

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा साक्षीदार असलेल्या रायरेश्वर पठारावर सोलापूरच्या निसर्गप्रेमींनी भटकंती केली. इको फ्रेंडली क्लबच्यावतीने 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर 2024 रोजी निसर्ग भ्रमंतीचे आयोजन करण्यात आले होते. या भटकंतीमध्ये सोलापूरसह कुर्डुवाडी आणि पुणे येथून निसर्गप्रेमींनी सहभाग नोंदवला.

निसर्ग पर्यटन वाढावे यासाठी कार्यरत असलेल्या इको फ्रेंडली क्लबच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वर पठारावर वाई परिसरात भटकंतीचे आयोजन करण्यात आले.

29 नोव्हेंबर रोजी पहाटे सर्व निसर्गप्रेमी वाई परिसरातील महेश सावंत यांच्या मधुरा ऍग्रो टुरिझम रिसॉर्ट येथे दाखल झाले. या ठिकाणी सर्वांच्या फ्रेश होण्याची आणि चहा, नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती.

Next Trek – Sudhagad – Pali (4 & 5 January 2025) – For more details click on image below…

त्यानंतर बस प्रवास करत सर्वजण वाई येथील महागणपती मंदिर परिसरात पोचले. कृष्णा नदीच्या तीरावर वसलेल्या गणपती मंदिराला आणि काशी विश्वनाथ मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले.

त्यानंतर सर्वांनी वाई येथील प्रसिद्ध मेणवली घाट आणि नाना फडणवीस वाडा पहिला.

वाड्याची ऐतिहासिक माहिती घेऊन सर्वजण आनंदून गेले.

त्यानंतर सर्वानी चंदू भोजनालय येथे दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेतला.

दुपारच्या जेवणानंतर सर्वांनी निसर्गरम्य ठिकाणी वसलेल्या श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरास भेट दिली. मंदिराचे बांधकाम आणि इतिहास आश्चर्यचकित करणारे होते.

त्यानंतर बस प्रवास करत सर्व निसर्गप्रेमींची टीम रायरेश्वर पठाराच्या पायथ्याला दाखल झाली. ऐतिहासिक रायरेश्वर पठाराचा ट्रेक करताना सर्वांचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला.

उंचावरुन दिसणारा सह्याद्री पाहून सर्वजण आनंदून गेले. रायरेश्वर पठारावर गेल्यानंतर सुंदर सूर्यास्त पहिला.

रायरेश्वर पठारावर टेंटमध्ये मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती. रायरेश्वर फोर्ट कॅपिंगचे सचिन, संदीप, सुनील जंगम आणि त्यांच्या कुटूंबीयांनी राहण्याची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था केली होती.

गुलाबी थंडीमध्ये सर्वांनी शेकोटीसमोर गप्पा गोष्टी करत आनंद लुटला.

रविवारी सकाळी फ्रेश झाल्यानंतर रायरेश्वराचे दर्शन घेतले. ज्या ठिकाणी साक्षात छत्रपती शिवरायांची आपल्या मावळ्यांसह हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती, तिथे सर्वजण नतमस्तक झाले. इको फ्रेंडली क्लबच्यावतीने सर्वांना पर्यावरण संवर्धनाची शपथ देण्यात आली. इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक परशुराम कोकणे यांनी शपथेचे वाचन केले. त्यानंतर निसर्गप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रायरेश्वर भटकंतीविषयी आपल्या भावना मांडल्या.

रायरेश्वर फोर्ट कॅम्पचे संदीप जंगम यांनी रायरेश्वर पठाराविषयी ऐतिहासीक माहिती सर्वांना सांगितली. त्यानंतर ट्रेकर्स रायरेश्वरावरील सात रंगाची माती पाहण्यासाठी गेले. एकाच परिसरात सात रंगांची माती पाहून निसर्गप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केले.

रायरेश्वरावरुन दिसणारे निसर्ग सौंदर्य खुपच मस्त होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत सर्वजण पुन्हा मंदिराजवळ पोचले. जंगम कुटुंबीयांच्या घरी मस्तपैकी गावरान जेवणावर सर्वांनी ताव मारला. दुपारचे जेवण करुन सर्वांनी रायरेश्वराचा निरोप घेतला.

सायंकाळी निसर्गप्रेमींचा हा ताफा गोंदवलेकडे रवाना झाला. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर मठामध्ये दर्शन घेतले. त्यांनतर गोंदवले येथील चैतन्य भोसले यांच्या हॉटेल विराटमध्ये रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक, वसुंधरा मित्र परशुराम कोकणे, समन्वयक सटवाजी (अजित) कोकणे, संतोषकुमार तडवळ यांच्या नेतृत्वाखाली गिरीश प्रभाकर घोगले, सौ उमा गिरीश घोगले, गंगुबाई कोकणे, सरस्वती कोकणे, पूजा कोकणे, आराध्या कोकणे, साची राजेश माळी, शिल्पा राजेश माळी, रेवती रवींद्र घनाते, सानिका रवींद्र घनाते, सरिता प्रशांत खेरोडकर, विद्या संतोष गवंडी, निलेश संगेपांग, शुभांगी संतोष गायकवाड , सुजाता शंकर जाधव, अजित वायचळ, योगिता वायचल, साईराज वायचळ, स्नेहा वायचल, अपर्णा सतीश काटकर, सुखा दत्तात्रय वाडरे, श्रीमती. कोकाटे मनीषा सुभाष, मेघा संजय क्षीरसागर, महिद्या सौरभ क्षीरसागर, गायत्री शास्त्री, रिया शास्त्री, अंकुश जाधव यांनी सहभाग नोंदवला.

लहानांचा उत्साही सहभाग
वाई – रायरेश्वर भटकंतीमध्ये साची, माहिज्ञा आणि आराध्या यांनी उत्साही सहभाग नोंदवला.

Related Articles

Back to top button