गुन्हे वृत्त

पिस्टल विकणारा आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

पिस्टल विकणारा आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : पिस्टल विकणारा आंतरराज्यीय गुन्हेगाराला सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी जिल्हयातील सर्व प्रभारी पोलीस अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना सोलापूर ग्रामीण जिल्हयातील अवैध धंदयावर तसेच अवैध अग्निशस्त्राबाबत विशेष शोध मोहिम राबवून कारवाई करणेबाबत आदेशीत केले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या होत्या.
सपोनि नागनाथ खुणे यांना व पथकातील पोलीस उपनिरीक्षक खाजा मुजावर यांना अवैध अग्निशस्त्राबाबत गोपनीय माहिती मिळाली की, कर्नाटक येथील एक इसम सोलापूर येथील इसमास देशी बनावटीचे पिस्टल विक्री करण्याकरिता संभाजी हॉटेल, पाकणी फाटा, ता. उत्तर सोलापूर येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त होती. त्यावरून सदर पथकाने सदर ठिकाणी सापळा लावला असता बातमीतील दोन इसम गावठी कट्याचा व्यवहार करत मिळून आले. त्यांचेकडे अधिक तपास करता करीम हमीदसाब मुरली, वय 48, रा. खजुरी, ता. आळंद, जि. कलबुर्गी याचेकडे देशी बनावटीचे पिस्टल विक्री करून आलेली 5,000/- रू. रोख रक्कम, मोबाईल असे मिळून आले व ती विकत घेणारा चंद्रकांत ऊर्फ चंदु विश्वनाथ लांडगे, वय 38, रा. बसवेश्वर नगर, सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना जवळ, होटगी रोड, सोलापूर याचे कब्जात खरेदी केलेले एक देशी बनावटीचे पिस्टल व 02 जिवंत राऊन्ड मिळून आले आहेत.

सदरबाबत सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 502/2024, भारतीय हत्यार कायदा क. 3,7/25. भा.न्या.सं.3(5), म.पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. आरोपींना 4 दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर झाला आहे.
करीम हमीदसाब मुरली, वय 48, रा. खजुरी, ता. आळंद, जि. कलबुर्गी याचेवर यापूर्वी उमरगा पोलीस ठाणे येथे खुनाचा 1 गुन्हा, अवैध शस्त्र विक्रीचा सोलापूर शहर येथे 1 गुन्हा व आळंद पोलीस ठाणे येथे कर्नाटक येथे 2 गुन्हे असे एकुण 4 गुन्हे दाखल आहेत.

चंद्रकांत ऊर्फ चंदु विश्वनाथ लांडगे, वय 38, रा. बसवेश्वर नगर, सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना जवळ, होटगी रोड, सोलापूर याच्यावर यापूर्वी विजापूर नाका, पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे अवैध शस्त्र बाळगल्याचा 1 गुन्हा दाखल आहे. जेलरोड पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे 1 व वळसंग पोलीस ठाणे येथे 1 मारामारीचे गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे यांचे नेतृत्वाखाली स.पो.नि नागनाथ खुणे, पोलीस उपनिरीक्षक खाजा मुजावर, स. फौ. नारायण गोलेकर, विजयकुमार पावले, पोलीस अंमलदार धनाजी गाडे, मोहन मनसावाले, सलिम बागवान अक्षय डोंगरे, सागर ढोरे-पाटील, समीर शेख यांनी बजावली आहे.

Related Articles

Back to top button