खड्डा तालीम शिवजन्मोत्सव अध्यक्षपदी महेश खानोरे
सोलापूर : खड्डा तालीम शिवजन्मोत्सव 2025 नूतन पदाधिकारी व नियोजन बैठक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पाडली.
2025 उत्सव अध्यक्ष महेश खानोरे तर कार्याध्यक्षपदी संतोष आलदी व संतोष झेडगे यांची निवड करण्यात आली.
गेल्या अनेक वर्षांपासून खड्डा तालीमच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध प्रकारचे देखावे सादर केले जातात. वर्षभरात विविध सामाजिक उपयोगी कार्यक्रम हाती घेऊन कार्य करत असतात. त्याच उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त खड्डा तालीम शिवजन्मोत्सव 2025 नूतन पदाधिकारी व नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांची पूजन दिवंगत सुनील भाऊ कामाठी यांना अभिवादन करून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पद्मशाली ज्ञाती संस्थेचे माजी अध्यक्ष माजी महापौर महेश कोठे, मनोहर चौगुले, आयान हेबळ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी खड्डा तालीमचे सर्वेसर्वा युवा नेते शिवा कामाठी, आकाश कामाठी, आकाश येळणे, जगन्नाथ काळे, मच्छिंद्र जाधव, मारुती विटकर, संजय कुमार माने, रंगनाथ मामा पवार, जावेद पटेल, अबीद घडेवाले, किशोर येळणे, वैभव परदेशी, दुर्गादास पवार, गणेश भाऊजी गवळी, हुसेन शेख, विशाल शिंदे, कृष्णा सुरवसे आदी उपस्थित होते.
Video – https://www.facebook.com/share/v/1NwxyhQWoJ/
खड्डा तालीम शिवजन्मोत्सव 2025 उत्सव अध्यक्ष महेश खानोरे, उपाध्यक्ष बाबू पवार, राज मंजुळकर, कार्याध्यक्ष संतोष आलदी, संतोष झेडगे, खजिनदार प्रशांत उंबरे, नागेश माने, सचिव महेश विटकर, पवन पुल्ली, ओमकार चव्हाण, हरी जाधव, सहसचिव महेश तलाठी, शिवलिंग शिंदे, सागर सुरवसे, लेझीम प्रमुख प्रवीण वाडेकर रमेश विटकर, गणेश भोसले, मिरवणूक प्रमुख सदा मामा येळणे, अमित घुगरे, डेकोरेशन प्रमुख मनोज चव्हाण, सोशल मीडिया प्रमुख मनोज कोडमुर, गणेश शर्मा, ऋषी पांढरे, निखिल बिराजदार, पूजा प्रमुख शुभम माने, रोहित पवार आदींची निवड करण्यात आली.
यावेळी युवा नेते आकाश कामाठी यांनी खड्डा तालीम शिवजन्मोस्तव 2025 चे नूतन सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा शुभेच्छा देऊन शिवजयंतीची रूपरेषा सांगितली.
खड्ड तालीम शिवजन्मोत्सव 2025 चे नूतन पदाधिकारी व नियोजन बैठकीची प्रस्तावना शुभम शिंदे यांनी केली तर आभार अतिश येळने यांनी मानले.