सोलापूर

Good News : दुहेरी जलवाहिनीसाठी 89 कोटींचा निधी

Good News : दुहेरी जलवाहिनीसाठी 89 कोटींचा निधी

HTML img Tag Simply Easy Learning

आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश; पिण्याच्या पाण्याचा सुटणार प्रश्न

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : सोलापूर शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्यासाठी उजनी ते सोलापूरपर्यंत बनवण्यात येत असलेल्या दुहेरी जलवाहिनीच्या कामाच्या पूर्ततेकरिता ८९ कोटी २९ लाख रुपयांचा निधी वितरित करण्याचे आदेश गुरुवारी नगर विकास विभागाने काढले. आमदार देवेंद्र कोठे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

हिवाळी अधिवेशनात आमदार देवेंद्र कोठे यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सभागृहात मांडला होता. उजनी धरण सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी असून देखील सोलापूर शहराला आठवड्यातून केवळ एकदा पाणी मिळत आहे. सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी टाकण्यात येत असलेल्या दुहेरी जलवाहिनीच्या ११० किमी च्या कामापैकी १०६ किमी जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असून केवळ ४ किमीचे काम शिल्लक राहिले आहे. मनपाने अद्याप जलशुद्धीकरण केंद्राची जागा ताब्यात घेतलेली नाही. राष्ट्रीय महामार्ग तसेच अन्य कारणांमुळे हे काम थांबल्याचे महापालिका सांगत आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करून शहराला नियमित पाणीपुरवठा करण्याबाबत प्रयत्न करावेत, अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांची भेट घेऊन जलवाहिनीचे काम पूर्ण होण्याकरिता असलेल्या अडचणींबाबत माहिती घेऊन त्या शासनापर्यंत पोहोचविल्या होत्या. याकामी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीही शासनाकडे पाठपुराव्यासाठी सहकार्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाबाबत बैठक घेऊन वित्त सचिवांना उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीसाठी निधी वितरित करण्याचे आदेश दिले होते. गुरुवारी निधी वितरित करण्याबाबतचा आदेश महाराष्ट्र शासनाने काढला आहे. शासनाने दिलेल्या या निधीमुळे दुहेरी जलवाहिनीच्या पूर्णत्वास मोठी गती मिळणार आहे.


नागरिक म्हणाले, पाणीदार आमदार विकास दमदार

आमदार देवेंद्र कोठे यांनी निवडणुकीत शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन सोलापूरकरांना दिले होते. दिलेला शब्द पाळत आमदार देवेंद्र कोठे यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीसाठी ८९ कोटी २९ लाख रुपयांचा निधी खेचून आणला. पाणीदार आमदार देवेंद्र कोठे यांची कामगिरी दमदार आहे.
– गणेश बुऱ्हाणपुरे,
नागरिक, सोलापूर

विकासाच्या वचनपुर्ततेशिवाय माघार नाही

सोलापूरच्या सर्वांगीण विकासाचे वचन आम्ही शहरवासीयांना दिले आहे. सोलापूरच्या पिण्याच्या पाण्यासह इतर सर्व नागरी प्रश्नांची सोडवणूक करण्यास प्राधान्य राहील. याकामी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे सहकार्य लाभले.

– देवेंद्र कोठे, आमदार,
शहर मध्य

Related Articles

Back to top button