परंपरा, श्रद्धा आणि निसर्गाचा संगम म्हणजेच नागपंचमी!

nagpanchami article by siddhi suryawanshi

श्रावण महिना लागला की, सलग सणवार सुरू होतात. त्यातला पहिला सण हा नागपंचमी असतो. श्रावण महिना सुरु झाल्यानंतर पाचव्या दिवशी किंवा पंचमी तिथीला नागपंचमी हा सण साजरा होतो. हिंदू संस्कृतीत घालून दिलेल्या रुढी, परंपरा आणि सणावारांना त्या -त्या काळा, वेळानुसार शास्त्रीय तसंच वैज्ञानिक कारण असतं. पण याबरोबरच काही पौराणिक कथाही त्याच्याशी जोडलेल्या असतात. जे त्याचे महत्व सांगतात.

अशाच काही कथा नागपंचमी या सणाविषयी सांगितल्या जातात. त्यापैकीच नाग देवतेला बंधू बनवल्याची कथा काय आहे जाणून घेऊया.पुराणकथा अशी सांगते की—
> एकदा एका शेतकऱ्याच्या दोन मुलांनी नांगर चालवताना सापांची वेटोळी (बिळे) उघडली आणि त्यामुळे अनेक नाग मरले. रागावलेली नागमाता त्यांच्या घरात गेली आणि दोघांनाही दंश केला. नंतर त्या शेतकऱ्याच्या कन्येने (बहिणीने) नागदेवतांची पूजा करून क्षमा मागितली. तिच्या भक्तीमुळे नागमाता प्रसन्न झाली आणि तिचे बंधू पुन्हा जिवंत झाले.
ही कथा सांगते की नागपंचमी हा बंधुप्रेम, क्षमा यांचे प्रतीक आहे.नागपंचमीबद्दल काही मनोरंजक तथ्ये आहेत जी तुम्हाला माहित असायला हवीत. हिंदू धर्मात, नागपंचमी हा एक सामान्य विधी आहे.
या दिवशी जमीन नांगरणे आणि झुडपे तोडणे निषिद्ध आहे.
तसेच, आम्ही कोणत्याही सापांना इजा करणार नाही किंवा मारणार नाही याची खात्री करा. अशाप्रकारे लोकांना देवाने निर्माण केलेल्या सर्व प्राण्यांचा आदर करण्याची आणि त्यांना आलिंगन देण्याची जाणीव होते. नागपंचमीला स्वयंपाकघरात लोखंडी भांडी वापरू नयेत असा सल्ला देखील दिला जातो.
शिवाय, नागपंचमी साजरी करण्याचे सर्वात स्पष्ट औचित्य म्हणजे सापांपासून संरक्षण मिळवणे.
श्रावण महिन्यात भरपूर पाऊस पडतो. पाण्याची पातळी वाढल्याने साप त्यांच्या बिळातून बाहेर पडतात.
ते स्वतःचा बचाव करण्यासाठी लोकांना चावू शकतात. म्हणून, या दिवशी सापांना दूध पाजले जाते.परंतु ते सापांच अन्न नाही.
लोकांचा असा विश्वास आहे की साप ज्या लोकांशी संवाद साधतात त्यांना ते आठवतात. पण शास्त्रन्याच्या मते हे चुकीचे आहे .सपांचा मेंदू हा फक्त शिकार करणे , प्रजनन करणे यासाठी विकसित झालेला आहे.संपूर्ण प्रथेचा उद्देश सापांना शांत करणे आणि हल्ला थांबवणे आहे.
दक्षिण भारतात, भाऊ आणि बहिणीमधील नाते वाढवण्यासाठी लोक नागपंचमी साजरी करतात.
या दिवशी, बहिणी त्यांच्या भावांच्या पाठीवर, कण्यावर आणि नाभीवर दूध किंवा तूप (स्पष्ट केलेले लोणी) लावतात. असे करण्यामागचे उद्दिष्ट भावाचे भविष्यातील संकटांपासून संरक्षण करणे आहे.
त्यानुसार, भाऊ-बहिणीमधील प्रेम आणि सामर्थ्य हे दूध चोळण्याद्वारे सूचित केले जाऊ शकते.
नागपंचमीची आणखी एक कथा समुद्र मंथन बद्दल आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की, भगवान शिव यांनी समुद्र मंथनातून बाहेर पडलेले विष प्यायले होते.
विषाचे काही थेंब जमिनीवर पडले आणि सापांनी ते गिळंकृत केले. म्हणूनच, लोक नागपंचमी साजरी करतात आणि या कारणास्तव सापांची पूजा करतात ….तसेच आपल्याला माहीत आहे नागपंचमी आली की महिलांचे खेळ सुरू..
झिम्मा, फुगडी, भारूड, ओव्या गात गात स्त्रिया एकत्र येऊन खेळतात.
नागाच्या स्तुतीतील गाणी गाताना त्यात भावनिक व धार्मिक भावना असते.
काही ठिकाणी नागदेवतेच्या गीतांवर नृत्य देखील केले जाते.
नागपंचमीला महिला खेळतात कारण —
हा त्यांचा धार्मिक व सामाजिक सहभाग असतो,
कुटुंबासाठी सुरक्षिततेची भावना असते,
आणि एकत्र येऊन सांस्कृतिक आनंद साजरा करण्याचा तो दिवस असतो.
साप बहुतेक वेळा अडचणीच्या, किंवा अंधाऱ्या ठिकाणी आढळतो. साप सर्व प्रकारच्या प्रदेशांमध्ये आढळून येतो. सापांच्या काही प्रजाती समुद्रात, गवताळ प्रदेशात दलदलीपाशी, वाळवंटामध्ये तसेच पर्वतांवर देखील सापडतात.
साप हे उष्णकटिबंधातील जंगलात मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. वाळवंटामध्ये आढळणाऱ्या प्रजातीच्या सापांच्या अंगावर खवल्यांचे बारीक बारीक उंचवटे असतात, यामुळे त्यांना सरकण्यास मदत होते. काही साप झाडांवर राहतात. झाडांच्या फांद्यांना किंवा झुडपांना गुंडाळलेले असतात. साप नद्या तळे किंवा नाले, पानथळे येथेही राहतात.
तसेच आता आपण काही गैरसमज समजून घेऊया..
साप पुंगीवर का नाचतो?
खरं म्हणजे साप “नाचत” नाही, कारण त्याच्याकडे कान नसतात – म्हणजेच, तो आवाज ऐकू शकत नाही!
मग साप का हलतो?
साप पुंगीचा आवाज ऐकून नाचत नाही, तर तो पुंगी वाजवणाऱ्या गारुड्याच्या हालचालीकडे (मोशन) पाहून प्रतिक्रिया देतो.
साप दृष्टीनं खूप संवेदनशील असतो. जेव्हा गारुडं पुंगी हलवतो, तेव्हा साप त्याच दिशेने हलतो आणि असं वाटतं की तो नाचत आहे.
हा प्रकार सापाला स्वतःचं संरक्षण करण्याचा प्रयत्न असतो.
एक साप मेला तर दुसरा साप त्याचा बदला घेतो का?
नाही, जर एक साप मेला, तर दुसरे साप त्याचा revenge करत नाहीत. हे पूर्णपणे मिथक (गैरसमज) आहे.
सत्य काय आहे?
1. साप सामाजिक प्राणी नाहीत – ते एकटे राहतात, झुंडीत राहत नाहीत.
2. त्यांच्याकडे भावना किंवा सूड घेण्याची बुद्धी (revenge psychology) नसते.
मिथक (गैरसमज) का पसरले?
एखाद्याने साप मारल्यावर काही वेळातच तिथे दुसरा साप दिसतो, त्यामुळे लोक म्हणतात की “तो सूड घ्यायला आला आहे”.
पण खरं म्हणजे:
मरणाऱ्या सापाच्या शरीरातून काही गंध (smell) बाहेर पडतात, जे इतर सापांना आकर्षित करतात.
साप केवड्याच्या (केवडा फुलाच्या) सुगंधाने आकर्षित होतात का? –
साप केवड्याच्या सुगंधाने आकर्षित होतात हे एक गैरसमज (Myth) आहे. यामागे कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही….साप त्यांच्या जीभेचा वापर करून आजूबाजूच्या वातावरणातील रासायनिक अणुंचा (chemical particles) शोध घेतात. ते जीभ बाहेर काढून हवेमधील किंवा जमिनीवरील गंधयुक्त रेणू गोळा करतात आणि त्यानंतर ती जीभ त्यांच्या तोंडात परत घेतात, जिथे ‘जेकॉबसन्स ऑर्गन’ (Jacobson’s organ) किंवा वॅमेरोनॅसल अवयव (vomeronasal organ) या विशेष संवेदनक्षम अवयवाच्या साहाय्याने हे रासायनिक संकेत प्रक्रिया केले जातात. यामुळे त्यांना आसपासच्या वातावरणात अन्न, भक्ष्य, भक्षक किंवा त्यांच्या जातीचे इतर साप यांची उपस्थिती ओळखता येते. ही प्रक्रिया म्हणजेच त्यांच्या संवेदनक्षम प्रणालीचा महत्त्वाचा भाग आहे.”
गर्भवती महिलांची दृष्टि जाते का साप पाहिल्यावर?
नाही, साप पाहिल्याने गर्भवती महिलेची दृष्टि जाते हा पूर्णपणे एक गैरसमज (Myth) आणि अंधश्रद्धा आहे. याला कसलाही वैज्ञानिक आधार नाही.याचं बरोबर अजून एक गैरसमज आहे की गर्भवती महिलेने साप पाहिल्यास होणार बाळ ही सापासारखं जिभ् बाहेर काढते.पण हि पूर्णपणे अंधश्रद्धा आहे.
ही अंधश्रद्धा का पसरली असावी?
भीतीचा प्रभाव: साप अचानक समोर आला तर कोणालाही घाबरून अचानक डोळ्यांपुढे अंधार येऊ शकतो – याला मनोवैज्ञानिक कारण आहे, सापाच्या ताकदीचा नाही.
गर्भवती महिला अधिक संवेदनशील असतात, त्यामुळे कधी-कधी घाबरल्यावर चक्कर येणे, डोळ्यांवर परिणाम होणं शक्य असतं – पण ते तात्पुरतं असतं, आणि सापामुळे नव्हे.
साप कपाळात हिरे घेऊन फिरतो का?
नाही, साप कपाळात किंवा डोक्यावर हिरा ठेवून फिरतो, हे पूर्णपणे एक गैरसमज आहे.साप कपाळावर नागमणी घेऊन फिरतो हा देखील एक गैरसमज आहे. प्रत्यक्षात, काही लोक बेंझीनसारख्या रसायनांनी विशिष्ट धातू किंवा दगडावर पॉलिश करून त्याला नागमणी म्हणून विकतात.
सपाने कात सोडल्यावर सापाचा पुनर्जन्म होतो का?
साप जेव्हा वाढतो, तेव्हा त्याची जुनी त्वचा लहान पडते किंवा खराब होते. म्हणून साप कात टाकतो — म्हणजे त्याची जुनी त्वचा टाकून देतो. हे नैसर्गिक वाढीचं आणि आरोग्याचं लक्षण आहे.
वरील माहिती आम्हला सर्प अभ्यासक राहुल शिंदे सर यांच्या मार्गदर्शनामुळे आणी त्यांच्या (महाराष्ट्रातील साप) या पुस्तकामुळे मिळाली.
सह्याद्रीच्या निसर्गासाठी
सेवेचे ठाई तत्पर
कु. सिद्धी विनोद सूर्यवंशी
निरंतर..
D.Y.Patil Technical Campus, Talsande.
(T.Y.Electrical)