‘पाहिजे जातीचे’ मराठी चित्रपटाचा सोलापुरात मुहूर्त

‘पाहिजे जातीचे’ मराठी चित्रपटाचा सोलापुरात मुहूर्त

pahije jatiche marathi movie news

 प्रसिद्ध नाट्यलेखक स्व. विजय तेंडुलकर यांच्या नाटकावर आधारित कथानक

 सिने अभिनेते सयाजी शिंदे यांची प्रमुख भूमिका

सोलापुरातील अनेक नवोदित कलाकारांना संधी

सोलापूर : प्रसिध्द नाट्यलेखक स्व.विजय तेंडूलकर यांच्या नाट्यकृतीवर आधारित गजरे फिल्म्स निर्मित "पाहिजे जातीचे" या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त सोहळा सोलापुरात मोठ्या उत्साहात सोमवारी दुपारी पार पडला. 

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हेमू चंदेले आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत कटके, निर्माते डॉ. मल्लिकार्जुन गजरे यांच्यासह प्रमुख कलाकारांची उपस्थिती होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन दक्षिणात्य नरेंद्र बाबू करीत आहेत. चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात सहकलाकार म्हणून झळकण्याची संधी सोलापुरातील अनेक कलाकारांना मिळाली आहे.

Actor Sayaji Shinde Interview

सुप्रसिद्ध नाट्य लेखक स्व.विजय तेंडुलकर यांचे 'पाहिजे जातीचे' या नाट्यकृतीने कधीकाळी मराठी रसिकांना जणू वेड लावले होते. तत्कालीन अनेक समस्यावर या नाट्यकृतीच्या माध्यमातून बोट ठेवण्यात आले होते. ही नाट्यकृती सिने पडद्यावर आणण्याचे धाडस गजरे फिल्मने केले आहे. या चित्रपटाचे निर्माते डॉक्टर मल्लिकार्जुन गजरे असून पटकथा आणि संवाद लेखिका उमा कुलकर्णी यांची आहे. विषय चांगला असल्यामुळे चित्रपट चांगला होईल या चित्रपटाचे चित्रीकरण गुलबर्गा आणि सोलापूर या ठिकाणी होणार आहे. पाहिजे जातीचे हा चित्रपट जातीवर आधारित नसून व्यक्ती कोणत्याही जातीचा असो त्याच्याकडे स्किल असले पाहिजे असे आहे. आजचा सिनेरसिक त्या नाट्यकृती इतकंच प्रेम या चित्रपटावर करतील असा विश्वास मूहूर्तप्रसंगी अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला.

Actress Sanjana Kale Interview -

या चित्रपटात विक्रम गजरे, अभिनेत्री संजना काळे यांच्यासह भागिरथीबाई कदम आणि दिपक शिर्के यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला अन्वेषा यांचं संगीत असून या चित्रपटात ४ गाणी आहेत. ही गाणी मराठी सिनेरसिकांच्या पसंतीला उतरतील, असा विश्वासही याप्रसंगी व्यक्त करण्यात आला. 

सोलापुरातील कलाकारांना संधी

'पाहिजे जातीचे' या चित्रपटाचा मुहूर्ताचा प्रसंग फ्लॅप देऊन सोलापुरात चित्रित करण्यात आला. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत कोणत्याही मराठी चित्रपटात जितक्या सहकलाकारांना एखाद्या शहरातून संधी मिळाली नव्हती, त्यापेक्षा अधिक कलाकारांना सोलापुरातून संधी देण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सिने रसिकांबरोबरच या कलाकारांची ही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यात प्रामुख्याने सोलापुरातील अभिजीत भडंगे, जिवोत्तम जयतिर्थ पडगानूर, सुशांत कुलकर्णी, श्वेता सापटनेकर, चैतन्य दातार, हनुमंत सलगर, साक्षी भागानगरे, मयुरी अष्टुळे, नेहा नेटके, तस्मिया मुजावर, तृप्ती सोनवणे यांच्यासह इतर कलाकारांचा समावेश आहे.

कबड्डी नागेंद्र बाबू अन् सीमावर्ती भागात चित्रण

नागेंद्र बाबू यांच्याकडे कन्नड दिग्दर्शक म्हणून पाहिले जाते. त्यांनी कलेला भाषा व प्रांताची मर्यादा नसते हे दाखवून देण्यासाठी कबड्डी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्या वेळेपासून त्यांच्याकडे कबड्डी नागेंद्र बाबू म्हणून पाहिले जाते. या चित्रपटाचे पुढील चित्रीकरण श्री स्वामी समर्थांची नगरी असा लौकिक असलेल्या अक्कलकोट परिसरात त्याचबरोबर सीमावर्ती भागातील गुलबर्गा परिसरात होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.