पोदार इंटरनॅशनलमध्ये ‘ग्रॅज्युएशन डे’ उत्साहात!

podar international school graduation day 2022

पोदार इंटरनॅशनलमध्ये ‘ग्रॅज्युएशन डे’ उत्साहात!

podar international school graduation day 2022

सोलापूर (Solapur) : 'पोदार इंटरनॅशनल स्कूल ही जागतिक दर्जा प्राप्त शाळा आहे' असे मत कुलगुरू मृणालिनी फडणवीस (Mrunalini Fadanvis) यांनी व्यक्त केले.

पोदार इंटरनॅशनल स्कूल ची सोमवारची रम्य सायंकाळ एका वेगळ्या गोष्टीचे आकर्षण ठरली. खरेतर दहावीच्या परीक्षा जवळ येत असताना प्रत्येक शाळा आपल्या विद्यार्थ्यांचा निरोप समारोह सोहळा आयोजित करत असते. परंतु पोदार इंटरनॅशनल स्कूल सोलापूर येथील विद्यार्थ्यांसाठी मात्र शाळेच्या वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'ग्रॅज्युएशन डे' समारोह आयोजित केला. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथी मान्यवर सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मृणालीनी फडणवीस आणि  डॉ. एस बी क्षीरसागर  प्राचार्य, दयानंद  अध्यापक महाविद्यालय, सोलापूर तसेच  पोदार एज्युकेशन नेटवर्क कोल्हापूर विभागचे जनरल मॅनेजर  कर्नल एस.पी.कुलकर्णी सर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे प्राचार्य समरेन्द्र पाणिग्रही सर, पोदार प्रशासन अधिकारी विजय कुमार पाटील सर, पोदार जंबो किड्स मुख्याध्यापिका आरती जवेरी आणि पोदार मानव संसाधन प्रमुख विनायक साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. सर्व प्रमुख अतिथी मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत आणि नृत्याने प्रमुख अतिथी मान्यवरांचे मनोरंजन केले. इयत्ता दहावीचे विद्यार्थी अतिशय नाविन्यपूर्ण अशा  दीक्षांत समारोहच्या वेशभूषेत  कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते. सर्व प्रमुख अतिथी मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि मानपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधत पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक अंक -रिपल्सचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी बोलताना माननीय कुलगुरू डॉ  मृणालिनी फडणवीस म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर निवडावे व त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे. त्याच बरोबर डॉ. एस.बी. क्षीरसागर सर यांनीही मुलांना जीवनात आनंदी राहण्याचा मौल्यवान सल्ला दिला.

कर्नल एस.पी.कुलकर्णी यांनी त्यांच्या विद्यार्थीदशेतील आठवणींना उजाळा देऊन विद्यार्थ्यांना प्रेरित केले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून शाळेचे प्राचार्य समरेन्द्र पाणिग्रही सर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले व त्यांच्या भावी जीवनाबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच इयत्ता दहावीतील विद्यार्थीनी इंशा आफरीन आणि इयत्ता दहावीचे वर्ग शिक्षक संतोष वाळवेकर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे शाळेचा माजी विद्यार्थी आर्यन अहिरे याच्या 'द कर्ब ऑन इन्फिनिटी' या पुस्तकाच्या लेखन कार्याबद्दल त्याचा मान्यवरांच्या हस्ते शाळेकडून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय मीनाक्षी पवार मॅडम, रामहरी घाडगे सर आणि लक्ष्मण उपाडे सर यांनी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील विद्यार्थीनी हिबा पटेल आणि अनन्या भारती यांनी केले. तर शाळेच्या सीनियर कॉर्डिनेटर आसमा तडमोड मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.

या अतिशय सुंदर सोहळ्यासाठी शाळेचे प्राचार्य समरेन्द्र पाणिग्रही यांचे मार्गदर्शन लाभले तर हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशालेच्या इवेंट कॉर्डिनेटर कविता पाटील, आम्रपाली चंदनशिवे यांचे सहकार्य लाभले. सर्व शिक्षक, पालक आणि इयत्ता नववी- दहावीच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ग्रॅज्युएशन डे सोहळा पार पडला.