राजकीय

प्रणितीताईंपेक्षा रामभाऊंचा खर्च जास्त!

सोलापूर : लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून निवडणूक प्रचाराकरिता केलेल्या खर्चाचा तपशील निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केला आला. प्रमुख पक्षाच्या उमेदवारांकडून प्रचारासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च आला असला तरी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नियमानुसार कमीत कमी खर्च दाखवण्यात आल्याचे दिसून येत आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी प्रचारासाठी ८१ लाख ७८ हजार ५६ रुपयांचा खर्च केला आहे. तर काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक प्रचाराकरिता ७४ लाख ५३ हजार १८१ रुपयांचा खर्च केला असल्याची माहिती लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून देण्यात आली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी ६२ लाख ६९ हजार ५९८ रुपयांचा खर्च निवडणुकीसाठी केला आहे. तर त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी ५१ लाख ९६ हजार ८०८ रुपयांचा खर्च निवडणुकीत केला असल्याची माहिती निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली.

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना ९५ लाख रुपयांपर्यंत खर्च करता येते. यापुढे उमेदवारांचा निवडणूक प्रचारावर खर्च झाला तर उमेदवारास निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याची कारवाई होऊ शकते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या तारखेस उपस्थित राहून उमेदवार किंवा त्याच्या प्रतिनिधीकडून खर्च सादर करणे आवश्यक असते सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची माहिती आतापर्यंत तीनवेळा घेण्यात आली आहे.

उमेदवारांनी सादर केलेला खर्च व निवडणूक यंत्रणेकडून धरण्यात आलेला खर्च या दोन्हींच मेळ घालून उमेदवारांच्या खर्चाचे आकडे निश्चित करण्यात येतात. उमेदवारांनी आतापर्यंत सादर केलेता व निवडणूक आलेल्या खर्चाचा तपशील निश्चित करण्यात आता आहे. उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चावर निवडणूक यंत्रणेकडून खर्चाचे आकडेवारी निश्चित करण्यात येते. उमेदवारांना याबाबत आक्षेप असल्यास त्यांना यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे हरकत घेता येणार आहे. मात्र आतापर्यंत कोणत्याही उमेदवारांनी यासाठी हरकत घेतली नाही.

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून ते मतमोजणीच्या दिवसापर्यंतचा खर्च उमेदवारांच्या खर्चात समाविष्ट करण्यात येतो. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. या दिवशी उमेदवारांनी केलेल्या वाहन व अन्य खर्चाचा तपशीलही उमेदवारांच्या खर्चात समाविष्ट करण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवारांचा अंतिम खर्च निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

(माहिती सौजन्य : सिंहासन)

Related Articles

Back to top button