राजकीय

प्रणिती शिंदेंचे पदयात्रेत जोरदार शक्तीप्रदर्शन

सोलापूर लोकसभेचा विजय सर्वांचा असेल : प्रणिती शिंदे

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : लोकसभा निवडणुकीचे मतदान लोकशाहीसाठी, संविधानसाठी, महागाई कमी करण्यासाठी, सोलापूरच्या विकसासाठी, आरक्षणासाठी, गोरगरिबांसाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी आहे. या लढ्यात आपण सर्वांनी साथ दिली. खांद्याला खांदा लावून ही लढाई माझ्यासोबत लढलात. आता येत्या 7 तारखेला हाताच्या चिन्हासमोरील बटन दाबून मतदान करा, असे आवाहन सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केले.

HTML img Tag Simply Easy Learning

प्रणिती यांनी शहरात पदयात्रा काढत प्रचाराचा शेवट केला. यावेळी सोलापुरच्या विकासासाठी तुमच्या सोलापुरच्या लेकीला मतदान करा. तसेच ही निवडणूक माझी एकट्याची असली तरी विजय तुम्हा सर्वांचा असेल, असे ही प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या.

प्रणिती पुढे म्हणाल्या की, सोलापूर हे सर्वधर्म समभाव मानणारे शहर आहे. या शहरातील मतदार म्हणजे देश, काम आणि विकासाला मतदान करणारे आहेत. भाजपकडून सोलापूरची एकी बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र बाहेरची लोकं सहजासहजी सोलापूरकरांची एकी बिघडवून शकत नाहीत, हे मतदारांनी दाखवून दिले आहे. मतदारांची ताकद ही मतदानाच्या दिवशी भाजपला कळेल. अभिजीत पाटलांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर प्रणिती म्हणाल्या की, भाजपकडून दबाव तंत्राचा वापर करत काही नेते आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपचे हे दबावाचे कटकारस्थान आता जनतेला माहित झाले असून जनता याला बळी पडणार नसल्याचेही शिंदे म्हणाल्या.

येत्या 7 मे ला हाताच्या चिन्हासमोरील बटन दाबून मताधिक्य देण्याचे आवाहनही प्रणिती शिंदे यांनी केले. यावेळी पद यात्रेचा छ्त्रपती शिवाजी महाराज चौक येथे समारोप करताना त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे आभार मानत शेवटचे दोन दिवस या लोकसभा निवडणुकीच्या रणागणात हा किल्ला लढवणे गरजेचं असल्याचे ही मत यावेळी प्रणिती यांनी व्यक्त केले.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या शहरातील प्रचाराचा शेवट पदयात्रेने झाला. कन्ना चौक येथून या पदयात्रेला सुरूवात झाली. ही पदयात्रा, जोडभावी पेठ, चाटला कॉर्नर, घोंगडे वस्ती, गुरूदत्त चौक, विश्रांती चौक, बलिदान चौक, मंगळवार पेठ पोलिस चौकी, सराफ कट्टा, माणिक चौक, दत्त चौक, राजवाडे चौक, नवी पेठ, मेकनिक चौक, भागवत टॉकिज या मार्गे निघाली. पदयात्रेचा शेवट छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाला.

प्रणिती एकटी निवडणूक लढवायला समर्थ : सुशिलकुमार शिंदे

या भव्य पदयात्रेच्या प्रारंभी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, सोलापूर लोकसभा मतदार संघात सत्ताधाऱ्यांचे पाच आमदार असताना देखील प्रणिती शिंदे एकटी असून ती ही निवडणूक लढवायला समर्थ आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ती एकटी फाईट करू शकते. ती सोलापूरकरांना न्याय मिळवून देईन, असा विश्वास आता जनतेमध्ये निर्माण झाला असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले.

यावेळी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार दिलीप माने यांनी प्रणिती शिंदे यांना दक्षिण विधानसभा मतदारसंघातून 30 ते 35 हजार मतांचा लीड मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. तर राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते महेश कोठे यांनी, भाजपच्या मागील दहा वर्षाच्या निष्क्रिय कारकीर्दीवर टीका करत प्रणिती शिंदे यांना जनता बहुमताने विजयी करेल, असा विश्वास व्यक्त केला. मागील दहा वर्षात भाजप सरकारने कामगार उध्वस्त केला. त्यामुळे आता मोदी सरकारला सत्तेतून खाली खेचण्याची गरज आहे. त्याची सुरुवात सोलापुरातून होईल. प्रणिती शिंदे यांना सोलापूर शहरातून 80 टक्के पेक्षा जास्त मतदान होईल, अशी प्रतिक्रिया कामगार नेते आडम मास्तर यांनी दिली.

प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ निघालेल्या पदयात्रेमध्ये माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी आमदार आडम मास्तर, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सचिव बंटी शेळके, निवडणूक प्रमुख प्रकाश यलगुलवार, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार दिलीप माने, ऊत्तमप्रकाश खंदारे, विश्वनाथ चाकोते, माजी महापौर महेश कोठे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल, शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड, गणेश वानकर, शिवसेना नेते अजय दासरी, अमर पाटील, गणेश वानकर, कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, राष्ट्रवादीचे भारत जाधव, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू तालिब डोंगरे, यू. एन बेरीया, मनोहर सपाटे, प्रताप चव्हाण, एम एच शेख, विष्णू कारमपुरी, महेश धाराशिवकर, यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button