सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन

विकास आणि समृद्धीसाठी नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करा!

On: April 21, 2024 5:49 AM
Follow Us:
HTML img Tag Simply Easy Learning

विकास आणि समृद्धीसाठी नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करा!

HTML img Tag Simply Easy Learning

आमदार सुभाष देशमख : भंडारकवठे येथील जाहीर सभेत राम सातपुते यांना मताधिक्य देण्याचा निर्धार

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात जनतेची फसवणूक केली. कायम जातीपातीचे राजकारण केले. त्यामुळेच २०१४ मध्ये जनतेने त्यांना सत्तेच्या बाहेर फेकले. त्यानंतर आलेल्या मोदी सरकारने अनेक विकासकामे केली. लोकांना विश्वासात घेऊन विविध योजना राबवल्या. या काळातील लोकांना या योजनेचा लाभ दिला. विकास आणि समृद्धीसाठी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी सोलापुरातून महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना प्रचंड बहुमताने निवडून आणावे, असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी भंडारकवठे येथील सभेत केले.

महायुतीचे उमेदवार राम सातपुते आणि आ. सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी दक्षिण तालुक्यातील ग्रामीण भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी विविध गावांना भेटी देत मोदी सरकारच्या योजना लोकांसमोर मांडल्या. तसेच पुढील भविष्यासाठी भाजपला निवडून आणण्याचे आवाहन केले. यावेळी आमदार राम सातपुते यांनी नांदणी, टाकळी, बोळकवठा, कुरघोट, हत्तरसंग कुडल, माळकवठे, कारकल या गावांना भेटी दिल्या. त्यानंतर सायंकाळी भंडारकवठे येथे सभा घेतली.

यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी दक्षिण मतदार संघातून राम सातपुते यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा निर्धार केला. यावेळी राम सातपुते म्हणाले की, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक विकासकामे केली आहेत. राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्येक मतदारसंघाला भरपूर विकासनिधी दिला आहे. दक्षिण तालुक्यात जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यात आमदार सुभाष देशमुख यशस्वी झाले आहेत. या पुढीलकाळात सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विकास कामांकरिता आपण कटिबद्ध आहोत.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, सरपंच भीमाशंकर बबलेश्वर, डॉ. चनगोंडा हवीनाळे, संदीप टेळे, आप्पासाहेब पाटील, अंबिका पाटील जगन्नाथ गायकवाड, हणमंत कुलकर्णी, हनुमंत पुजारी, यतीन शहा, सोमनिंग कमळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe Youtube Channel

Join Now