सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन
---Advertisement---

कर्तृत्ववान महिलांना रविवारी ‘रमाईची लेक’ पुरस्कार

On: February 27, 2026 2:23 PM
Follow Us:
---Advertisement---
HTML img Tag Simply Easy Learning

RamaiChi Lek Award Rajabhau Mane Solapur

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : येथील रमाई सेवाभावी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीचे औचित्य साधून ‘रमाईची लेक’ पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १४ महिलांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक राजाभाऊ माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमात स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाच्या निवेदिका, पत्रकार सरस्वती नारायणकर-कोकणे यांचाही सन्मान होणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

हा सोहळा रविवारी सकाळी १० वाजता हॉटेल सूर्या येथे पार पडणार आहे. मातोश्री रमाई यांच्या त्याग, संघर्ष आणि समर्पणाच्या प्रेरणेतून समाजात कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांचा सन्मान या सोहळ्यात केला जाणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आणि आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, दत्ता गायकवाड, संस्थेचे संस्थापक राजा माने, तसेच संयोजिका रितू माने यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गौरव सोहळा संपन्न होईल. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव विनोद माने आणि सल्लागार संतोष कदम विशेष परिश्रम घेत आहेत.
यावर्षीच्या पुरस्कारासाठी प्रशासकीय सेवेतील महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त विजयलक्ष्मी कुरी, आरटीओ निरीक्षक प्रतीक्षा नारायणकर, महावितरणच्या कनिष्ठ अभियंता मेधा शिवगुंडे, शैक्षणिक क्षेत्रातील प्रा. डॉ. तेजस्विनी कांबळे, उद्योग क्षेत्रातील अंजली वाघमारे, सामाजिक क्षेत्रातील सुनंदा साळुंखे आणि कला क्षेत्रातील चित्रकार सुजाता शिंदे, आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. योगिनी साबळे आणि नर्सिंग क्षेत्रातील ज्योती व्यंकट शिंदे यांचाही यात समावेश आहे. तसेच उत्कृष्ट नगरसेविका अश्विनी चव्हाण, पत्रकारिता क्षेत्रातील सरस्वती कोकणे आणि आदर्श माता म्हणून नंदाबाई वाघमारे व सुभद्रा गायकवाड यांना ‘रमाईची लेक’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe Youtube Channel

Join Now