गुगलची चूक शोधणाऱ्या ऋतुराजला मिळाले जॉईनींग लेटर!

ruturaj choudhari bihar google news
बिहार : गेल्या आठवड्यात गुगल या संकेतस्थळाला काही वेळासाठी हॅक करून चूक दाखवून देणाऱ्या बिहार येथील ऋतुराज चौधरी (Ruturaj Choudhari) )या तरुणाला गुगलने जॉइनिंग लेटर पाठवले आहे. गेल्या आठवडाभरापासून सोशल मीडियावर त्याच्या नावाची चर्चा आहे. या संदर्भातील एक लेख फेसबुकवर व्हायरल झाला आहे.
तो लेख पुढील प्रमाणे-
ll प्रेरणापुंज ऋतुराज ll
बिहारचा युवक ऋतुराज चौधरीने गेल्या आठवड्यात रात्री १:०५:०९ वाजता गुगल ला हादरवून सोडलं. त्याने ५१ सेकंदांपर्यंत गुगल इंजिनच हॅक करून टाकलं. हॅक होताच असम दुनियेत बसलेल्या गुगल अधिकाऱ्यांचे हातपाय थंडगार पडले. अमेरीकेच्या ऑफिसमधे एकच हल्लकल्लोळ माजला.
त्यांना नेमकं कारण कळण्यापुर्वीच म्हणजे ५१ सेकंदाने ऋतुराजने गुगल फ्री करून इंजिनची सेवा पुन्हा पुर्ववत सुरू केली आणि गुगलला मेल करून कळवून दिले की गुगलच्या नेमक्या कोणत्या चुकीमुळे तो ते हॅक करू शकला.
सदरहू ई मेल करून ऋतुराज झोपी गेला कारण आपल्या देशात रात्र होती. परंतू मेल वाचून अमेरीका मात्र बैचैन झाली. मेल मधे ऋतुराजने दिलेल्या सर्व तपशीलानुसार तिथल्या अधिकाऱ्यांनी सुध्दा १ सेकंदासाठी गुगल हॅक करून पाहिलं आणि त्यांना तांत्रिक उणिवेची खात्री पटली.
अमेरीकेत तडकाफडकी ह्या गंभीर विषयावर १२ तास मिटींग चालली आणि शेवटी निर्णय झाला की संबंधीत युवकाला बोलाविण्यात यावं.
दिवसा ठीक २ वाजता ऋतुराज ला मेल आला की 'आम्ही तुझ्यातील गुणवत्तेला सॅल्यूट करत आहोत. कृपया तू आमच्यासोबत काम कर .
आमचे अधिकारी तुला न्यायला येत आहेत.'
लगेच दुसऱ्या मेलद्वारा गुगलने ऋतुराजला
'जॉईनींग लेटर ' दिले ज्यामधे ३.६६ कोटी रूपयांचे पॅकेज आहे.
ऋतुराज जवळ पासपोर्ट नव्हता.गुगलने भारत सरकारशी विस्तृत चर्चा केली आणि केवळ दोन तासाच्या अवधीमधे त्याचा पासपोर्ट तयार करून त्याच्या घरी पोहोचता केला. ऋतुराज आता प्रायव्हेट जेट विमानाने अमेरीकेला रवाना होईल.
ऋतुराज हा आय आय टी मणिपूर येथील 'बी टेक' द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. आणि बेगुसराय शहराजवळ असलेल्या मुंगेरगंज नावाच्या खेड्याचा रहिवासी आहे.
जगाच्या सुपरपॉवरला भारी पडलेल्या भारतमातेच्या ह्या अद्भुत गुणवंत युवकाला सलाम !