सोलापूर

‘दक्षिण’चे संतोष पवार ‘राष्ट्रवादी’च्या मार्गावर?

Santosh Pawar Marg Foundation Meet Sharad Pawar News

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्यासाठी प्रयत्नशील असलेले मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी नुकतीच राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मोतीबागेतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय घडामोडीवर त्यांनी चर्चा केली. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात आपल्या पक्षाकडून संधी दिल्यास लढण्याची तयारीही पवार यांनी त्यांच्याकडे दर्शवली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात संतोष पवार हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील का? याची चर्चा रंगली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

संतोष पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर मतदारसंघातील एकूण जातीय समीकरणाचा इतिहास पाहता बहुजन चेहरा म्हणून खा. पवार यांच्याकडून मद्रेचे पवार तुतारी हाती घेतील का? अशी एक चर्चा मतदारसंघात रंगत आहे.

सध्या हा मतदारसंघ जागावाटपात काँग्रेस पक्षाकडे आहे. मात्र या पक्षाकडून जिल्ह्यात सर्वाधिक इच्छुकांची संख्या याच मतदारसंघात आहेत. माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापूरे, सिध्देश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी, एमके फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनूरे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, माजी सभापती इंदुमती अलगोंड-पाटील असे रतीमहारथी आहेत. ऐनवेळी जागा वाटपातील तडजोड होण्याची शक्यता पाहता हा मतदारसंघ तुतारीला सोडण्याचा निर्णय झालाच तर भुमिपुत्र म्हणून संतोष पवार यांनी खा. पवार यांची खास भेट घेऊन उमेदवारी दिल्यास ताकतीने लढणार असल्याचे अभिवचन त्यांना दिल्याची चर्चा आहे.

शिवाय मार्ग फौंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक आणि गरीबांना करण्यात येत असलेल्या विविध प्रकारच्या सहकार्याविषयीसह अन्य सामाजिक उपक्रमा विषयीची माहिती सविस्तर पणे त्यांना दिलेला आहे. तसेच या मतदारसंघातील विविध गावच्या यात्रा आणि जत्रेतील कुस्ती फडाला हजेरी लावणे आणि जिंकलेल्या मल्लाला चांदीचा गदा भेट देणे आणि या माध्यमातून लोकांमध्ये चर्चेत राहण्याचा त्यांचा आजतागायत प्रयत्न राहिला आहे.

तसेच बहुजन समाजाचा मतदान हे लाखाहून अधिक असल्याचे सांगत त्याची एकत्रित मोट गेल्या अनेक दिवसांपासून बांधल्याची माहिती सुध्दा खासदार पवार यांना देण्यात आली आहे. आणि खासदार यांच्या परिचयातील असलेले बंजारा समाजाचे शिक्षण महर्षी स्व. चंद्राम चव्हाण गुरूजी आणि माजी सभापती स्व. उमाकांत राठोड यांचे सामाजिक कामही मोठा आहे. याचाही आपल्याला फायदा होणार असल्याचा विश्वास त्यांनी त्यांना दिला आहे. बहुजन चेहरा आणि विशिष्ट ध्येय उराशी बाळगून निवडणुक लढविण्याच्या उद्देशाने मी राजकारणात सक्रीय झाल्याचे ते सांगत आहेत. म्हणूनच यंदा दक्षिण सोलापूर मतदारसंघात तुतारी वाजणार असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे.

Related Articles

Back to top button