सोलापूर

सर्वत्र नाकाबंदी! कारण..

solapur city nakabandi news

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : शहरात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे. नाकाबंदी करून पोलिसांनी दुचाकी आणि चार चाकी वाहनांची तपासणीची मोहीम राबवली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

पोलीस उपायुक्त विजय कबाडे म्हणाले, वेगाने वाहन चालवणारे बाईकस्वार यासह नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या अनुषंगाने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सर्वत्र नाकाबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

शनिवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत आहे. खास करून रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे. रेसिंग बाईकवर कारवाई केली जात आहे, असे उपायुक्त कबाडे यांनी सांगितले.

नागरिकांनी आपल्या वाहनांची कागदपत्रे सोबत ठेवावीत, पोलिसांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहनही पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button