सोलापूर

सोलापुरात नवीन काय काय होतंय माहिती आहे का?

सोलापूर : राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रमांतर्गत शहरात सुरु असलेल्या विविध कामांची महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी पाहणी केली.

HTML img Tag Simply Easy Learning

HTML img Tag Simply Easy Learning

राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहराच्या मुख्य प्रवेशद्वार असलेल्या छत्रपती संभाजी महाराज चौक म्हणजेच जुना पुना नाका या ठिकाणी सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. या ठिकाणी असलेल्या तीन आयलंडमध्ये वातावरणातील धूळ कमी करण्यासाठी वॉटर कर्टन, पुलाच्या आजूबाजूला विविध देशी वृक्ष व फुलझाडे, पुलाखाली सोलापूरची परंपरा दर्शविणारी भित्तीचित्रे, शहरात येणाऱ्यांच्या स्वागतासाठी आकर्षक विद्युत योजना, इको फ्रेंडली सुशोभीकरण आणि हरित पट्टे तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच अक्कलकोट रोड येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल कॉलेजच्या लगत येथे पूर्ण जागेत विविध देशी प्रजातींच्या झाडांचा हरित पट्टा, नागरिकांसाठी 1 km लांबीचा निसर्गरम्य जॉगिंग पार्क व बसण्यासाठी व्यवस्था, पाणी जिरवण्यासाठी तसेच सामाजिक कार्यक्रमांसाठी पारंपारिक डिझाईनचा कुंड, मियावकी गार्डन, नागरिकांसाठी निसर्गरम्य आकर्षक आधुनिक पद्धतीचा फूड पार्क, फूड ट्रक्ससाठी स्वतंत्र सोय, मियावकी गार्डन, 2 व्हीलर आणि 3 व्हीलर पार्किंगची सोय इत्यादी कामे करण्यात येत आहेत.

  • Video –

डी मार्ट, जुळे सोलापूरसह विविध ठिकाणी सुशोभीकरणाची कामे अंतिम टप्प्यात असून महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले यांनी आज दुपारी या सर्व ठिकाणाची पाहणी केली. सोलापूर शहरात प्रवेश करताना हरित सौंदर्य दिसावे या उद्देशातूनही कामे करण्यात येत आहे. राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत सोलापूर महापालिकेच्या वतीने हवा प्रदूषण कमी करण्यासाठी हरित क्षेत्र वाढवण्याकरिता शहरातील विविध ठिकाणी या कार्यक्रमांतर्गत धूळ नियंत्रित करण्यासाठी वॉटर फाउंटेन , वॉटर कर्टन, इको फ्रेंडली सुशोभीकरण आणि हरित पट्टे तयार करण्यात येत आहेत. दरम्यान आज जुना पूना नाका, तुळजापूर नाका, अक्कलकोट रोड, डी मार्ट, जुळे सोलापूर येथे आज आयुक्त शीतल तेली – उगले यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. सुशोभीकरण करण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना यावेळी आयुक्त शीतल तेली-उगले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी नगर अभियंता सारिका आकुलवार, सहाय्यक अभियंता प्रकाश दिवानजी, आर्किटेक शशिकांत चिंचोळी, मुन्ना तळीकडे, अभिजीत बिराजदार, सागर खरोसेकर आदी अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button