गुन्हे वृत्त

भावाच्या घरातून 4 लाख 92 हजारांचे दागिने केले गायब!

सोलापूर : चुलत भावाच्या घरात चोरी करून 4 लाख 92 हजार 520 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या टीमने ही कामगिरी पार पाडली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार श्रीकांत बाबू गोलेकर (वय ३७ वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी, रा. ब्लॉक नं. १४, सोनी नगर, मोदी हुडको, सोलापूर) यांचा चुलत भाऊ अनिल शंकर गोलेकर याच्या घरी 22 जानेवारी 2025 रोजी धार्मिक कार्यक्रम होता.

HTML img Tag Simply Easy Learning

कार्यक्रम असल्याने अनिल गोलेकर यांच्या घरी पाहुणे ये जा करीत होते. कार्यक्रमासाठी आलेले नातेवाईक श्रीकांत यांच्या घरातून अनिल यांच्या घरीही ये-जा करीत होते. त्यामुळे श्रीकांत व कुटुंबियांनी त्याचे घरास कुलूप न लावता घर उघडेच ठेवले होते.

कार्यक्रमादरम्यान 22 जानेवारी रोजी सकाळी सकाळी 10 ते रात्री 10.30 दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने श्रीकांत यांच्या राहते घरात प्रवेश करुन, बेडखाली ठेवलेली पत्र्याची पेटी व त्यामध्ये ठेवलेले सोने व थांदीचे दागिने चोरुन नेले होते. या घटनेबाबत सदर बझार पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या पथकातील अंमलदार यांनी घटनास्थळाला भेट दिली होती. गुन्हा करण्याच्या आरोपीच्या पध्दतीवरुन सपोनि शैलेश खेडकर यांना तक्रारदार यांचे जवळच्याच कोणीतरी माहितगार व्यक्तीने गुन्हा केला असल्याबाबत दाट संशय होता. त्यामुळे गुन्हा उघडकीस आणणे अत्यंत कठिण झाले होते. परंतु सपोनि शैलेश खेडकर व पथकाने गुन्हा करण्याच्या पध्दतीवरुन, गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळविली. तसेच त्या अनुषंगाने तांत्रीक माहितीचे अत्यंत कौशल्याने काळजीपूर्वक विश्लेषण केले. या सर्व माहिती वरुन गुन्हा करणारा व्यक्ती श्रीकांत गोलेकर याचा चुलत भाऊ अनिल गोलेकर (वय-३३ वर्षे, धंदा मजुरी रा. ब्लॉक नं. १२९, सोनी नगर, मोदी हुडको सोलापूर) हा असल्याची खात्री केली. त्यानंतर त्यास सपोनि शैलेश खेडकर व पथकाने सापळा लावून तो दागिने विक्री करण्यासाठी जात असताना मुददेमालासह 7 फेब्रुवारी 2025 रोजी मोदी स्मशानमुमी जवळून ताब्यात घेतले. त्याचे अंगझडतीत चोरलेले ८५.७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे व १८४.५ वजनाचे चांदीचे दागिने असा एकुण ४.९२,५२०/-रु. किंमतीचा ऐवज सविस्तर पंचनाम्याने हस्तगत केला व सदरचा गुन्हा अत्यंत काळजीपुर्वक, कौशल्याने उघडकीस आणला.

सदरची कामगिरी एम. राजकुमार, पोलीस आयुक्त, सोलापुर शहर, डॉ. दिपाली काळे, पोलीस उपायुक्त, गुन्हे, श्री. राजन माने, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे तसेच श्री. सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे स.पो.नि. श्री. शैलेश खेडकर व पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपुत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, बाळासाहेब काळे तसेच सायबर पो. स्टे कडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे.


ऑनलाइन गेमिंगचे व्यसन!

चोरी करणारा आरोपी अनिल गोलेकर याला ऑनलाइन गेम खेळण्याचे व्यसन आहे. ऑनलाइन गेमिंगच्या नादात त्याला कर्ज झाले आहे. हे कर्ज फेडण्याच्या विचारातूनच अनिलने चुलत भाऊ श्रीकांतच्या घरात चोरी केल्याचे तपासास समोर आले आहे. अलीकडे अनेक तरुणांना ऑनलाईन गेमिंगचे व्यसन लागले आहे. याकडे कुटुंबीयांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
– शैलेश खेडकर,
सहाय्यक पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा सोलापूर

Related Articles

Back to top button