तृतीयपंथी आयुबला सोन्यासाठी संपवलं!

Solapur Crime Branch Smart Solapurkar News
सोलापूर : मुर्गी नाला परिसरातील तृतीयपंथी व्यक्तीच्या खुनाचा उलगडा गुन्हे शाखेच्या पथकाने सहा तासात केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २६/१२/२०२५ रोजी रात्री १०:३० वा. ते दिनांक २७/१२/२०२५ रोजी दुपारी ०१:३० वा. चे दरम्यान अयुब हुसेन सय्यद (तृतीयपंथी) यांचा त्याचे सोलापूर शहरातील राहते घर नं २२६, पहिला मजला पेंढारी मस्जिदच्या पाठीमागे मुर्गी नाला उत्तर सदर बझार लष्कर या ठिकाणी अज्ञात इसमांनी कोणत्यातरी अज्ञात कारणाने खून केला होता. त्यानुसार सदर बझार पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १०५४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) प्रमाणे दि.२७/१२/२०२५ रोजी गुन्हा दाखल आहे. त्याअनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याचे घटनास्थळी भेट दिली. त्यानुसार मा. पोलीस आयुक्त सोलापूर शहर, मा. पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे/वि.शा. व सहायक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना तसेच सदर बझार पो.स्टे. कडील अधिकारी व अंमलदार यांना सदरचा गंभीर स्वरूपाचा खूनाचा गुन्हा उघडकीस आणणे बाबत योग्य त्या सूचना दिलेल्या होत्या.
त्यानुसार श्री. अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांनी गुन्हे शाखेकडील व श्री नामदेव बंडगर वपोनि सदर बझार पो.स्टे यांनी पोलीस ठाणे कडील तपास पथकांना वरील प्रमाणे घडलेला गंभीर खुनाचा गुन्हा उघडकीस आणणे बाबत योग्य मार्गदर्शन / सूचना देवून त्यांना तपासाकरीता रवाना केले होते.
त्यानुसार गुन्हे शाखेकडील स.पो.नि. शंकर धायगुडे, स.पो.नि. विजय पाटील, स.पो.नि. शैलेश खेडकर, स.पो.नि. दत्तात्रय काळे, पो.उपनि. मुकेश गायकवाड, ग्रेड पो. उपनि. शामकांत जाधव व त्यांचे पोलीस पथक तसेच सदर बझार पो.स्टे. कडील सपोनि सागर काटे व त्यांचे पोलीस पथक यांनी तांत्रिक माहितीचे आधारे व सी.सी.टी.व्ही. फुटेजची तपासणी करून नमूद गुन्हा हा ०३ इसमांनी मिळून केल्याची व सदरचे आरोपी हे लातूर जिल्ह्याचे दिशेने गेल्याचे खात्रीशीर दिसून आले.
त्यानुसार दिनांक २७/१२/२०२५ रोजी गुन्हे शाखेचे व सदर बझार पो. स्टे कडील तपास पथके तात्काळ लातूरकडे रवाना होवून नमूद आरोपींची ओळख पटविली. त्यानंतर लातूर येथील विवेकानंद चौक पोलीस स्टेशन येथील पोलीसांची मदत घेवून आरोपी नामे (१) यशराज उत्तम कांबळे वय-२१ वर्षे व्यवसाय शिक्षण रा.बौध्द विहार जवळ, इंदिरा नगर लातूर (२) आफताब इसाक शेख वय-२४ वर्षे व्यवसाय मजुरी, रा. कुंभारवाडी ता. रेणापूर जि. लातूर (३) वैभव गुरूनाथ पनगुले व्यवसाय शिक्षण रा. कुंभारवाडी ता. रेणापूर जि. लातूर यांना गोपनिय माहितीचे आधारे विवेकानंद चौक येथील पाण्याचे टाकी जवळील परिसर, लातूर येथून ताब्यात घेतले.
त्यानंतर त्यांचेकडे करण्यात आलेल्या अधिक चौकशीमध्ये यातील आरोपी क्रमांक २ आफताब इसाक शेख व मयत अयुब हुसेन सय्यद हे यापूर्वीपासूनच ओळखीचे असून आफताब शेख हा मयत अयुब सय्यद यास भेटण्याकरीता वारंवार सोलापूर येथे येत होता. त्यावेळी आफताब शेख यास अयुब सय्यद याचेकडे भरपूर प्रमाणात सोन्याचे दागिने व रोख रक्कम असल्याची माहिती होती. त्याप्रमाणे नमूद तिन्ही आरोपी मयत अयुब सय्यद यास भेटण्याचा बहाणा करून मयताकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरण्याचे उद्देशाने आरोपी यशराज कांबळे याचेकडील युनिकॉर्न मोटार सायकल वरून सोलापूर येथे आले होते. त्यावेळी नमूद तिन्ही आरोपींनी मिळून अयुब सय्यद याचा त्याचे राहते घरी खून करून आयुब याचे घरातील सोन्या सारखे दिसणारे दागिने, रोख रक्कम व मोबाईल फोन चोरी केल्याची कबुली दिली आहे. तसेच खून करून जातेवेळी त्या तिघांनी मयताची यामाहा स्कूटी ही मोटार सायकल चोरून घेवून गेले होते.
सदरचा गंभीर गुन्हा गुन्हे शाखेकडील व सदर बझार पो.स्टे. कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कौशल्यपूर्ण तांत्रिक तपासाच्या आधारे ०६ तासाच्या आत उघडकीस आणला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. भालचंद्र ढवळे सदर बझार पो.स्टे. हे करीत असून नमूद आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी अटक करून त्यांना मा. न्यायालयानी दिनांक ३१/१२/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
या पथकाने केली कामगिरी
ही कामगिरी मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, श्री. विजय कबाडे पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), डॉ. अश्विनी पाटील पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.), श्री. राजन माने, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे, श्री. दिलीप पवार, सहा. पोलीस आयुक्त विभाग-२, यांचे मार्गदर्शनाखाली-श्री. अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, स.पो.नि. शंकर धायगुडे, स.पो.नि. विजय पाटील, स.पो.नि. शैलेश खेडकर, स.पो.नि. दत्तात्रय काळे, पो. उपनि. मुकेश गायकवाड, ग्रेड पो.उपनि. शामकांत जाधव व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, बापू साठे, अंकुश भोसले, संदिप जावळे, जावेद जमादार, अनिल जाधव, विनोद रजपूत, महेश शिंदे, वाजीद पटेल, योगेश बर्डे, शैलेश बुगड, काशिनाथ वाघे, राजकुमार वाघमारे, आबाजी सावळे, संजय साळुंखे, कुमार शेळके, अभिजित घायगुडे, राजकुमार पवार, इम्रान जमादार, धिरज सातपुते, अजिंक्य माने, सैपन सय्यद, सुभाष मुंडे, वसिम शेख, राजु मुदगल, महेश पाटील, महेश रोकडे, राजेश मोरे, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, चालक सतिश काटे, बाळासाहेब काळे तसेच सायबर पोलीस ठाणे कडील प्रकाश गायकवाड व मच्छिद्र राठोड तसेच सदर बझार पो.स्टे. कडील व.पो.नि. नामदेव बंडगर, पोनि श्री ढवळे, स.पो.नि. सागर काटे व पोलीस पथक यांनी केली आहे.


