विद्यार्थ्याचे अपहरण करून लुटले


सोलापूर : फार्मसीचे शिक्षण घेत असलेल्या 19 वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण करून 20 हजार रुपये जबरदस्तीने ऑनलाइन पद्धतीने काढून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी सर्वेश शामसुंदर बाहेती (वय 19, रा. सम्राट चौक, श्री अपार्टमेंट, प्रभाकर महाराज मंदिराजवळ, सोलापूर) याने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली आहे.

पोलिसात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, 23 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 6 वाजता सर्वेश हा कारंबा नाका येथील महेश सोसायटी परिसरातून दुचाकीवरून निघाला होता. चौघा अनोळखी व्यक्तींनी सर्वेश यास आडविले. दुचाकी वाहनावर बसून पुणे रोडवर घेऊन गेले. क्यू आर कोड स्कॅन करून सर्वेश याच्या मोबाईलमधील 20 हजार रुपये काढून घेतले.
संशयित आरोपींनी सर्वेशच्या वडिलांना फोन करून पैशांची मागणी केली. पैसे नाही दिले तर मुलाला ठार मारण्याची धमकी दिली. वडिलांनी पैसे देतो असे म्हटल्यानंतर सकाळी 8.30 वाजता पुणे रोडवरील मडके वस्ती परिसरातील नेक्सा शोरूम जवळ सर्वेश यास सोडून आरोपी निघून गेले.
सर्वेशचे वडील शामसुंदर बाहेती यांचा मेडिकलचा व्यवसाय आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
अपहरण की बनाव?
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. सर्वेश याने अपहरणाचा बनाव केल्याचा संशय पोलिसांना आहे. नेमके काय घडले हे तपासानंतर समोर येण्याची शक्यता आहे.
Solapur Crime Kidnap News Sarvesh Baheti