सोलापूर DFO पदावर लक्ष्मण आवारे!

Solapur Divisional Forest Office DFO Laxman Aware News
सोलापूर : सामाजिक वनीकरण विभाग सोलापूर कार्यालयाच्या Divisional Forest Office (DFO) विभागीय वन अधिकारीपदी लक्ष्मण आवारे यांनी पदभार घेतला आहे.
वन अधिकारी लक्ष्मण आवारे हे पिंपळनेर (ता. माढा, जिल्हा सोलापूर) गावचे सुपुत्र आहेत. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून 2010 साली ते महाराष्ट्र वनसेवेमध्ये दाखल झाले. वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून गडचिरोली जिल्ह्यात त्यांची पहिली पोस्टिंग झाली. त्यानंतर त्यांनी काही काळ मेळघाट येथे सेवा बजावली. पदोन्नतीनंतर सहाय्यक वनसंरक्षक म्हणून त्यांनी सोलापूर वनविभागात सेवा बजावली. सोलापूर येथून लक्ष्मण आवारे यांची बदली विभागीय वन अधिकारी पदावर भंडारा येथे झाली. भंडारा येथे दोन वर्षाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर श्री. आवारे यांची सोलापूर सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकारी पदावर बदली झाली आहे. त्यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारला आहे.
‘सोलापूर जिल्ह्यात वनीकरणाचे काम अधिक उत्तमपणे केले जाईल. पर्यावरण प्रेमींच्या सहकार्याने अधिकाधिक वृक्षारोपणाचे उपक्रम राबवण्यात येतील. तसेच सामाजिक वनीकरण विभागाच्या स्मृतीवन उद्यानातही सुधारणा करण्यात येतील’, अशी ग्वाही विभागीय वन अधिकारी लक्ष्मण आवारे यांनी स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाचे संपादक परशुराम कोकणे यांच्याशी संवाद साधताना दिली आहे.



