गुन्हे वृत्त

स्वतःची मुलं असतानाही बाळाचे अपहरण!

Solapur faujdar chavdi police station news

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : स्वतःला मुलं असतानाही सिद्धेश्वर मंदिर परिसरातील फिरस्त्या महिलेच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या हत्तुर वस्ती परिसरातील महिलेला आणि तिच्या साथीदाराला फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

ग्रामदैवत श्री सिध्देश्वर मंदिर परिसर व फुटपाथवर मिळेल त्या ठिकाणी फिरस्ती सौ. समिना निजाम शेख, वय ३० वर्षे, राहणार- मु.पो. मस्साजोग, ता. केज, जि. बीड, सध्या सिध्देश्वर मंदिर परिसर, फुटपाथ सोलापूर ही तीची आई श्रीमती नौशाद, मुलगा सुलतान व लहान मुलगा रिवान वय ०४ महिनेसह राहणेस आहे. समिना शेख ही फिरस्ती असुन, मिळेल ते खाऊन पिऊन तीचा उदरनिर्वाह चालविते. सौ. समिना शेख ही तीचे मुलाबाळासह दिनांक २८/०७/२०२५ रोजी रात्री ११.०० वा. सुमारास सिध्देश्वर प्रशाला जवळील स्टेशनरी दुकाना समोर झोपलेली होती. दिनांक २९/०७/२०२५ रोजी सकाळी ०६.०० वा. सुमारास रियान वय ०४ महिने हा तीचे जवळ नसल्याचे दिसुन आले, तेव्हा तीने तीच्या मुलाचा मंदिर परिसर व इतरत्र शोध घेतला असता, तो मिळुन आला नाही. समिना शेख यांना “पोलीस ठाणे येथे तक्रार द्या, पोलीस मुलाचा शोध घेतील” असा कोणीतरी सल्ला दिल्याने, समिना शेख ह्या फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे उपस्थित राहुन, मुलगा रियान वय ०४ महिने, यास कोणीतरी घेऊन गेल्याचे सांगितले. समिना शेख यांच्या तक्रारीची दखल घेऊन, फौजदार चावडी पोलीस ठाणे गुरनं ५६५/२०२५ भान्यासक १३७(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वपोनि. महादेव राऊत यांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेउन, तात्काळ सपोनि/क्षिरसागर व डी.बी. पथक यांना अल्पवयीन बालकाचा शोध घेणेबाबत योग्य त्या सुचना दिल्या.

त्याप्रमाणे वपोनि श्री. महादेव राऊत व पोनि.श्री.तानाजी दराडे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि /क्षिरसागर, सपोनि. जाधव व डी.बी. पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केले असता, त्यात एक संशयीत इसम व महिला असे दोघे नमुद अल्पवयीन बालकाला पळवुन नेत असताना दिसुन आले त्याअनुषंगाने तात्काळ इतर सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन गुप्त बातमीदारमार्फत सीसीटीव्ही फुटेज मधील संशयीत यांचा शोध घेतला असता, सीसीटीव्ही मधील संशयीत इसम हा मुन्ना शेख रा. हत्तुरे वस्ती, सोलापूर असल्याची माहीती प्राप्त झाली. पोलीसांनी तात्काळ सदर व्यक्तीचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेवुन चौकशी करता सदर बालक रियान यास मुन्ना अलिसाब शेख वय २७ वर्षे, राह. हत्तुरे वस्ती, सोलापुर व त्याची साथीदार महिला नामे शबाना अमीन शेख राह. हत्तुरे वस्ती यांनी मिळुन पळवुन आणले असुन सदर बालक हा त्याचे घरापासुन जवळच राहण्यास असलेल्या शबाना शेख हिचे घरात असल्याचे सांगीतले. त्याप्रमाणे सदर महिला शबाना अमीन शेख वय ३५ वर्षे रा. हत्तुरे वस्ती मुळ रा. धाराशीव हिस ताब्यात घेतले असता अपहृत रियान हा शबाना हिचे ताब्यात मिळुन आला. यातील आरोपीतांनी बालक रियान यास कोणत्या कारणास्तव पळवून नेले आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत. अशाप्रकारे पोलीसांनी कौशल्याचा वापर करुन माहिती मिळाले पासुन ८ तासात मुलगा रियान वय ०४ महिने याचा शोध घेऊन वरील नमुद आरोपीतांना ताब्यात घेतले आहे. मुलगा रियान यास फिर्यादी यांना दाखवताच त्यांचे अश्रु अनावर झाले व त्यांनी पोलीसांचे शतशः आभार मानले आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. एम. राजकुमार सो, मा. पोलीस उपायुक्त श्री. विजय कबाडे साो, मा. सहा. पोलीस आयुक्त वि-०१ श्री. प्रताप पोमण साो, वपोनि श्री. महादेव राउत साो, पोनि. श्री. तानाजी दराडे सो यांचे मार्गदर्शना खाली सपोनि, संजय क्षिरसागर, सपोनि/विजय जाधव, पोह/१२३२ चुंगे, पोकॉ/१४५६ बडुरे, पोकॉ/१८३८ पुजारी, पोकॉ/१६०४ होटकर, पोकॉ./१८८५ खरटमल, पोकॉ/१४६८ तलवार, पोकॉ./१७१० दराडे, पोकॉ./१७५८ घोडके, पोकों./ १८५२ गळाकाटे नेमणूक फौजदार चावडी पो. ठा. यांनी केलेली

Related Articles

Back to top button