गुन्हे वृत्त
मी परत येणार नाही!

सोलापूर : सदर बझार परिसरात राहणारी 19 वर्षीय तरुणी घरातून निघून गेली आहे. एमएससीआयटी क्लासवरुन ती घरी परत आली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली (नाव बदलले आहे) हिचे 2 महिन्यापूर्वी मामासोबत लग्न झाले आहे. 25 जानेवारी 2024 रोजी मामाने रुपालीला एमएससीटीच्या क्लासला नेऊन सोडले. क्लासवरून ती परत आली नाही. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. ती सापडत नसल्याने शेवटी सदर बाजार पोलीस ठाण्यात कुटुंबीयांनी धाव घेतली आहे.

मला माफ कर.. असे म्हणत रुपालीने मामा असलेल्या नवऱ्याच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवली आहे. सदर बाजार पोलीस ठाण्याचे हवालदार एम.सी. इनामदार तपास करीत आहेत.