वृध्द महिलेला संपवून चोरी करणाऱ्या दोघांना अटक
Solapur Gramin Police LCB Murder Arrest News
सोलापूर : अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी सोलापूर ग्रामीणचा पदभार घेतल्यापासून जिल्ह्यातील गुन्हेगारीवर लक्ष केंद्रीत केले असून जिल्ह्यातील चालू वर्षातील उघडकीस न आलेल्या खूनाच्या गुन्ह्यांचा आढावा घेतला होता.
कामती पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये सिंधुबाई हरीबा घाडगे (वय ७४ वर्षे, रा. अरबळी) या त्यांचे शेतातील वस्तीवरील घरात एकट्याच राहण्यास होत्या. दिनांक २९.०४.२०२४ रोजी रात्री जेवण करून त्या झोपी गेल्या असता चोरट्यांनी प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने चोरण्याच्या उद्देशाने जबर मारहाण करून गंभीर जखमी केल्याने त्या जागीच मयत झाल्या होत्या. सदर गुन्ह्याचा तपास हा सहायक पोलीस निरीक्षक, कामती पोलीस ठाणे हे करत होते. परंतू अद्याप सदरचा गुन्हा उघडकीस आला नव्हता.
यामुळे मा.श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणनेबाबत श्री. सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांनी सुचना दिले होते. त्यावरून पोनि सुरेश निंबाळकर यांनी गुन्ह्याच्या झालेल्या तपासाचा आढावा घेवून गुन्हा उघडकीस आणणेबाबत श्री. रविराज कांबळे, पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण व त्यांच्या पथकास मार्गदर्शन केले होते.
त्यावरून पोसई रविराज कांबळे यांचे पथकातील पोकों हरीश थोरात व राहूल दोरकर यांना सदरचा गुन्हा करणारे आरोपींची माहिती ही गोपनिय बातमीदारांकडून समजली होती. त्यावरून सदरचे पथक हे आरोपींच्या मागावर असताना दिनांक १२.०९.२०२४ रोजी ते २ आरोपी हे बेगमपूर येथील पुलाखाली थांबले असल्याची माहिती समजली होती. त्यावरून पोसई कांबळे यांनी पथकासह बेगमपूर येथे जावून सापळा लावला असता आरोपींना पोलीस आल्याचा सुगावा लागताच त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला परंतू पोलीस पथकाने पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले आहे. सदर आरोपीकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासामध्ये सदर आरोपींना सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. त्यावरून सदर आरोपींना पुढील तपासकामी कामती पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि ज्ञानेश्वर उदार, कामती पोलीस ठाणे हे करत आहेत. सन २०२४ मध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून उघडकीस न आलेले खूनाचे एकूण ०६ आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक करून उघड केले आहेत.
सदरची कामगिरी अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, प्रितम यावलकर अपर पोलीस अधीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक, रविराज कांबळे, पोलीस उपनिरीक्षक, पोह प्रकाश कारटकर, विरेश कलशेट्टी, पो.कॉ. हरीश थोरात, राहूल दोरकर, धनराज गायकवाड, अजय वाघमारे, यश देवकते, सागर ढोरे-पाटील, अन्वर आतार, सतिश बुरकुल सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांनी केली आहे.