सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन

सोलापूर आयटी पार्कसाठी मुंबईत होणार बैठक

On: March 22, 2026 7:03 PM
Follow Us:
HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर आयटी पार्कसाठी मुंबईत होणार बैठक

HTML img Tag Simply Easy Learning

Solapur IT Park News Association Meets Minister Ashish Shelar

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : सोलापूरमधील प्रस्तावित ‘आयटी पार्क’ला गती देण्यासाठी आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्यासाठी सोलापूर आयटी असोसिएशनच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. या महत्त्वपूर्ण बैठकीत सोलापूरसह राज्यातील आयटी धोरणात सुधारणा करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

धोरणात्मक सुधारणांचा प्रस्ताव सादर

सोलापूर आयटी असोसिएशनच्या वतीने माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि नवीन गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण तयार करण्याच्या उद्देशाने एक विशेष प्रस्ताव ना. शेलार यांना सादर करण्यात आला. महाराष्ट्राच्या विद्यमान आयटी धोरणामध्ये (IT Policy) काही महत्त्वाच्या धोरणात्मक सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे स्थानिक उद्योजकांना पाठबळ मिळेल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

मंत्रालयात लवकरच विशेष बैठक

शिष्टमंडळाने मांडलेल्या मुद्द्यांची गंभीर दखल घेत ना. आशिष शेलार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन देत, त्यांनी या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी मंत्रालयातील संबंधित वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांसोबत लवकरच एक ‘फॉलो-अप’ बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

यांची होती उपस्थिती

या बैठकीला सोलापूर आयटी असोसिएशनचे संस्थापक-अध्यक्ष अपूर्व मनोहर जाधव, उपाध्यक्ष माउली झांबरे, सचिव जयंत होळे-पाटील, संचालक विराज कुलकर्णी, दर्शन जाधव, गंगाधर थळंगे यांच्यासह असोसिएशनचे इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते.

सोलापूरमधील आयटी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आणि या प्रकरणाचा सकारात्मक निकाल लावण्यासाठी असोसिएशनच्या वतीने सातत्याने पाठपुरावा केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. असोसिएशनबद्दल अधिक माहितीसाठी उद्योजकांनी www.itas.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe Youtube Channel

Join Now