सोलापूर

प्रियकराने बोलायचे बंद केले म्हणून..

Solapur love breakup crime news

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : अलीकडे छोट्या छोट्या कारणावरून लोकांना टेन्शन येत आहे. टेन्शनमधून लोकं अगदी टोकाचे पाऊल उचलत आहेत. अशीच एक घटना गेल्या आठवड्यात सोलापुरात घडली आहे. सोलापुरातील महाविद्यालयात शिकायला असलेल्या जळगावच्या तरुणीने प्रेम प्रकरणातून ग.ळ.फा.स घेऊन आ.त्म.ह.त्या केली आहे. याप्रकरणात जेलरोड पोलिसात प्रियकर असलेल्या तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

दर्शना पाटील (वय 21, सध्या रा. सत्यम चौक, राज पॅलेस, सोलापूर) असे आयुष्याचा शेवट केेलेल्या तरुणीचे नाव आहे. प्रियकर स्वयम लब्बा (रा. सोलापूर) याच्यावर आ.त्म.ह.त्ये.स प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

ही घटना सत्यम चौक परिसरातील राज पॅलेस या इमारतीमध्ये 25 एप्रिलला सायंकाळी साडेपाच ते 26 एप्रिलच्या रात्री सव्वा नऊ यावेळेत घडली आहे. याप्रकरणात दर्शनाचे वडील प्रविण विठ्ठल पाटील (वय 48, रा. ओमसाई रेसिडेन्सी, शिरसोली रोड, मेहरून तलाव जवळ जि. जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण पाटील यांची मुलगी दर्शना ही सोलापुरातील महाविद्यालयात शिकायला होती. ती मैत्रिणींसोबत सत्यम चौकात राहण्यास होती. आरोपी स्वयम लब्बा याने दर्शनासोबत गेल्या एक वर्षापासून जवळीक निर्माण केली होती. 25 एप्रिलला दर्शना आणि स्वयम या दोघात किरकोळ भांडण झाले. त्याने दर्शनासोबत बोलणे बंद केले होते. तसेच तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला होता.

प्रियकराने आपल्यासोबत दगा केल्यानंतर दर्शना निराश झाली. घटनेच्या दिवशी तिच्या मैत्रिणी गावाला गेल्या होत्या. रुमवर ती एकटीच होती. मानसिक तणावातून दर्शना हिने आयुष्याचा शेवट करण्याचे ठरवले. तिने ग.ळ.फा.स घेतला. स्वयम याने दर्शना हिला आ.त्म.ह.त्ये.स प्रवृत्त केल्याचा गुन्हा जेलरोड पोलिसात दाखल झाला आहे. दर्शनाची घटना घडल्यापासून प्रियकर स्वयम गायब झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. सहायक पोलिस निरीक्षक ज्योत्स्ना बांभिष्टे करीत आहेत.

Related Articles

Back to top button