सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन
---Advertisement---

आमदार देवेंद्रदादांनी असा साजरा केला वाढदिवस

On: September 9, 2025 5:11 PM
Follow Us:
---Advertisement---

Solapur MLA Devendra Kothe Birthday Social Activity News

सोलापूर : युवा आमदार देवेंद्र कोठे यांचा सोमवार 8 सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. देवेंद्रदादांच्या आवाहनानुसार त्यांच्या समर्थकांनी आत्मतृप्ती योजनेला भरभरून मदत केली आहे. आत्मतृप्ती योजनेसाठी 3 लाख 55 हजार 461 रुपये रोख आणि 2 लाखांचे धान्य मदत स्वरूपात मिळाले आहे.

आमदार देवेंद्र कोठे यांनी काका स्व. महेश अण्णा कोठे यांचे जानेवारी महिन्यात दु:खद निधन झाल्याने वाढदिवस साजरा करणार नाही आणि शहरात थांबणार नाही असे नम्रपणे जाहीर केले होते.

मागील काही वर्षांपासून आमदार देवेंद्र कोठे यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ नेते स्व. विष्णुपंत कोठे आत्मतृप्ती योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून वर्षातील 365 दिवस 100 निराधार गरजवंतांना रोज दोन वेळचे पुरेल असा जेवणाचा डबा (चपाती, भाजी, भात) घरपोच दिला जात आहे.

आमदार झाल्यानंतर देवेंद्र कोठे यांचा हा पहिलाच वाढदिवस होता. त्यांनी ठरवले असते तर शहरात सगळीकडे बॅनरबाजी आणि भरगच्च कार्यक्रम आयोजित करू शकले असते. मात्र नेहमीप्रमाणे देवेंद्र दादांनी सामाजिक जाणीव दाखवून दिली.

वाढदिवसाच्या निमित्ताने आत्मतृप्ती योजनेला हातभार लावण्याचे आवाहन आमदार देवेंद्र कोठे यांनी केले होते. त्यानुसार आत्मतृप्ती योजनेसाठी 3 लाख 55 हजार 461 रुपये रोख आणि 2 लाखांचे धान्य मदत स्वरूपात मिळाले आहे.

Devendra Kothe Solapur

‘माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्व. विष्णुपंत कोठे आत्मतृप्ती योजनेला भरघोस मदत प्राप्त झाली आहे. रोख किंवा धान्य स्वरूपात आत्मतृप्ती योजनेला सहाय्य करून निराधारांचे आधार बनण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद मिळाला आहे. जितकी रक्कम जमा झाली आहे, तितकीच मी स्वतः माझा मुलगा चि. श्रीविष्णुराज व मुलगी कु. कवीश्री यांच्या जन्मदिनानिमित्त आत्मतृप्ती योजनेला देणार आहे.
– देवेंद्र राजेश कोठे
आमदार, भारतीय जनता पार्टी, सोलापूर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now