सोलापूर

सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळुरू विमानसेवा

Solapur Mumbai Solapur Bengaluru Air Service News

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूरकरांची स्वप्नपूर्ती!

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळुरू विमानसेवा

15 ऑक्टोबरपासून सुरू होणार !

सोलापूर : सोलापूरकरांची दीर्घ प्रतीक्षा संपली असून येत्या १५ ऑक्टोबरपासून सोलापूर विमानतळावरून सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळुरू या दोन्ही मार्गांवर नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होणार आहे.

नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर सोलापूरला मिळणारी ही दुहेरी भेट सोयीस्कर, वेगवान आणि आधुनिक वाहतुकीकडे एक मोठे पाऊल आहे ! या विमानसेवेमुळे सोलापूरकरांना राज्याची आर्थिक राजधानी मुंबई तसेच दक्षिण भारतातील औद्योगिक केंद्र बंगळुरूशी थेट व जलद हवाई संपर्क मिळणार आहे. व्यापारी, उद्योजक, विद्यार्थ्यांसह भाविकांसाठीही या नव्या सेवेमुळे प्रचंड सोय होणार आहे.

दोन्ही विमानसेवांचं बुकिंग २० सप्टेंबर, २०२५ पासून सुरू होणार असून सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिजीएफ मंजूर केल्याने या सोलापूर-मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे. याबद्दल मुख्यमंत्री आणि महायुती सरकारचे मनःपूर्वक धन्यवाद ! मोदी सरकारच्या माध्यमातून या विमानतळाची निर्मिती केल्यानंतर प्रत्येक विमानसेवा सुरु करण्यासाठी आपले विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू होते. ज्याला आता यश आले आहे. मुंबई आणि बंगलोर या दोन सेवा सुरु होणे, हा सोलापूरच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा आहे.

‘सोलापूरसारख्या ऐतिहासिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या शहराला थेट मुंबई व बंगळुरूशी जोडणं ही काळाची गरज होती. या हवाईसेवेमुळे सोलापूरकरांचा प्रवास वेळ वाचणार आहेच, शिवाय या भागात गुंतवणूक, रोजगारनिर्मिती व पर्यटनाला चालना मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेत सोलापूरचा अधिक प्रभावी सहभाग होईल, असा मला विश्वास आहे.

अनेक दिवसांची प्रतीक्षा पूर्ण झाली आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूरकरांना नवरात्रोत्सवानिमित्त दिलेली ही खास भेट आहे. अनेक वर्ष विमानसेवा नव्हती म्हणून नाराजी व्यक्त केली जायची आता सोलापूरकरांनी मागे राहुन चालणार नाही. सोलापूर- मुंबई, सोलापूर – बेंगलोर या विमानसेवेचा सोलापूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा. 

– देवेंद्र कोठे, आमदार

Related Articles

Back to top button