गुन्हे वृत्त

पोलिसांनी कार अडवली! सापडला 48 किलो गांजा..

Solapur police found 48 kg ganja in the car

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सोलापूर पुणे महामार्गावर कार मधून 48 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. रात्र गस्तीदरम्यान पोलिसांनी तपासणीसाठी कार अडवून ही कारवाई केली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 4/03/2025 रोजी रात्री 11.15 वा वेळी शहर वाहतुक शाखा सोलापूर शहरकडील पोलीस अंमलदार प्रकाश निकम व पोलीस अंमलदार भालेराव यांना वाहतुक कारवाई संबंधाने रात्र ड्युटी देण्यात आली होती.

वाहन तपासणी दरम्यान सोलापूर – पुणे महामार्गावरील सर्व्हिस रोडने जंगली हॉटेल जवळ, विजापूर बायपास ओव्हर ब्रिजचे सव्हिस रोडवर विटकरी कलरची कार क्र.MH 47 AN 8917 निघाली होती. पोलिसांनी कारला अडवले. कारमधील चालकाने कागदपत्र दाखवितो असा बहाणा केला. फोनवरुन बोलत दूर जावून अंधाराचा फायदा घेवून तो पळून गेला.

कारचा संशय आल्याने पोलिसांनी आतमध्ये पाहणी केली. कारच्या डिक्कीमध्ये गांजा सापडला. पोलिसांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना संपर्क करुन घटनेच्यासंबंधाने माहीती दिली. त्यावर त्याबाबत वरिष्ठांना माहीती देवून त्याप्रमाणे पोनि तानाजी दराडे यांना पुढील कायदेशीर कारवाईबाबत सुचीत केले.

कायदेशीर कारवाई करुन फौजदार चावडी पोलिस ठाण्यात वाहन कार क्र.MH 47 AN 8917 चा चालक याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईमध्ये एकूण 48 किलो गांजा अंदाजे किंमत 8 लाख 64 हजार तसेच वाहन वाहन कार क्र.MH 47 AN 8917 ज्याची किं अं 6 लाख रु असा एकूण 14 लाख 64000 रु चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

गांजा कोठून आणला व कोठे घेवून जात होता? सदर गाडी कोणाची आहे? याबाबतचा तपास चालू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त, विभाग 1 प्रताप पोमण यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोनि तानाजी दराडे, सपोनि शंकर धायगुडे, सपोनि रोहन खंडागळे, पोह 1232 प्रविण चुंगे, पोकॉ 1456 कृष्णा बडुरे, पोकों 1617 दत्तात्रय कोळवले, पोकों 1612 नितीन जाधव यांनी कामगिरी केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक तानाजी दराडे हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button