सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन
---Advertisement---

पोलिसांचा दणका; सालार टोळीवर ‘मोक्का’ची कारवाई!

On: July 27, 2025 4:18 AM
Follow Us:
---Advertisement---

Solapur Police IPS M Rajkumar action against Salar gang

पोलिसांचा दणका; सालार टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई!

सोलापूर : पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर पोलिसांनी सालार टोळीला जोरदार दणका दिला आहे. सालार टोळीवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

दि.02/07/2025 रोजी, दुपारी 02.30 वा चे सुमारास, मौलाना आझाद चौक, नई जिदंगी, सोलापूर येथे सोहेल रमजान सय्यद यांनी, यातील आरोपींना दिलेले हात उसणे पैसे परत मागितले असता, त्या कारणावरून, यातील आरोपी नामे जाफर शेटे, टिपु सालार, फैसल सालार, पापड्या, अक्रम पैलवान व त्यांच्यासोबत असलेले इतर 3 ते 4 इसम यांनी, फिर्यादीस लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच, फैसल सालार याने, फिर्यादीस मे इधर का भाई हु.. कोई आगे आया तो उसे खल्लास कर दूंगा..” असे म्हणुन, चाकूच्या सहाय्याने धमकावले. तसेच, नमूद आरोपींनी, त्याठिकाणी दहशत निर्माण केल्याने, तेथे जमलेले लोक घाबरून पळु लागले. त्यावेळी, तेथील, दुकानदारांनी आपली दुकाने बंद करून घेतली. तसेच तेथे राहणारे रहिवासी यांनी देखील आप-आपली घरे बंद करून घेतली. त्यानंतर, फैसल सालार याने, त्याच्या हातातील चाकुने फिर्यादीच्या पोटात खुपसून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत असताना, फिर्यादीने त्यांचा डावा हात त्याच्या आडवा घातला. त्यामुळे, त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने ते खाली पडले. त्यावेळी, वरील सर्व इसम हे तेथुन पळुन गेले.

याबाबत, फिर्यादीने 1) फैसल सालार रा. विजापूर वेस, मुल्लाबाबा टेकडी सोलापूर, 2) जाफर शेटे रा. पेंटर चौक, सोलापूर, 3) टिपु सालार रा. विजापूर वेस, मुल्लाबाबा टेकडी सोलापूर, 4) पापड्या (अॅम्ब्युलन्स चालक) रा. पत्ता माहित नाही, 5) अक्रम पैलवान रा. विजापूर वेस, मुल्लाबाबा टेकडी सोलापूर व त्यांच्यासोबत असलेले 3 ते 4 इसम यांच्याविरूध्द दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 109,189(1), 189 (2), 189(4),191(1), 191(2),191(3),190,351(2) (3),49 सह भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 सह फौजदारी सुधारणा कायदा कलम 7 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3), 135,142 प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल आहे.

सदर गुन्हयाच्या तपासात, गुन्ह्यातील, निष्पन्न आरोपी (1) फैसल अब्दुल रहीम सालार, (2) जाफर महम्मद युसुफ शेटे, (3) सईद ऊर्फ टिपू अब्दुल रहीम सालार, (4) अनिस अहमद ऊर्फ पापड्या रियाज रंगरेज, (5) अक्रम ऊर्फ पैलवान कय्युम सातखेड व (6) वसीम ऊर्फ मुकरी अब्दुल रहीम सालार यांनी, मागील 10 वर्षात (सन-2015 ते सन-2025 या कालावधीत), संघटीत गुन्हेगारी टोळीचा सदस्य या नात्याने, स्वतःचे अथवा टोळीचे अवैध आर्थिक फायद्यासाठी, तसेच परीसरात वर्चस्व कायम राखण्यासाठी, हिंसाचाराचा (बळजोरी-Violence) चा वापर करुन, 03 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेले, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, गंभीर दुखापत करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे यासारखे 07 दखलपात्र गुन्हे केले असून, सदर गुन्ह्यातील नमुद आरोपी हे, एकाच टोळीचे सदस्य असल्याचे निष्पन्न झाले. 

पोलिस आयुक्त, श्री.एम. राज कुमार यांनी, दिनांक 21/07/2025 रोजी, सालार टोळीविरूध्द, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3(1)(ii), 3(2), 3(4) हे कलम समावेश करण्यास पूर्व परवानगी दिलेली आहे. त्यानुसार, सदर गुन्ह्यामध्ये, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3(1)(i),3(2),3(4) या कलमांची (मोक्का कायदयाची) वाढ करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री. राजन माने, सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे) सोलापूर शहर हे करीत आहेत.

मोक्का कारवाई काय आहे?

मोक्का (MCOCA) म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा. हा कायदा 1999 मध्ये महाराष्ट्रात लागू करण्यात आला, ज्याचा उद्देश संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर नियंत्रण मिळवणे आहे.

संघटित गुन्हेगारी:

हप्ता वसुली, खंडणी, सुपारी, खून, अंमली पदार्थांची तस्करी अशा गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या टोळ्यांवर मोक्का कारवाई केली जाते. 

कठोर कारवाई:

मोक्का अंतर्गत, आरोपींना जामीन मिळणे कठीण होते आणि त्यांना कठोर शिक्षा होऊ शकते. 

अटक आणि शिक्षा:

मोक्का लावल्यास, आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवले जाते आणि त्यांना 5 वर्षांपासून जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते. 

मालमत्ता जप्ती:

मोक्का कायद्यात, आरोपींच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई देखील केली जाते. 

संघटित गुन्हेगारीला आळा:

या कायद्याचा उद्देश, संघटित गुन्हेगारी टोळ्यांना आळा घालून समाजाला सुरक्षित करणे आहे. 

मोक्का कधी लावला जातो?

जर एखाद्या व्यक्तीवर एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल असतील आणि ते गुन्हे संघटित गुन्हेगारी टोळीशी संबंधित असतील, तर त्याच्यावर मोक्का लावण्याची शक्यता असते, असे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे. 

या कायद्यांतर्गत, पोलिसांना विशेष अधिकार मिळतात, जसे की पाळत ठेवणे, पुरावे गोळा करणे आणि आरोपींना अटक करणे. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now