गुन्हे वृत्त

गळ्याला कोयता लावून लुटले!

Solapur Sadar Bazaar Police News

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : दरोड्याचा गुन्हा सदर बझार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने एक तासाचे आत उघडकीस आणला. गुन्ह्याच्या तपासात आरोपी निष्पन्न करून 5 आरोर्पीना अटक केली आहे. गुन्ह्यातील रक्कम रुपये 1,20,000/- पैकी रुपये 65,000/- व आरोपींनी गुन्ह्यात वापरलेला कोयता हस्तगत केला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

दिनांक 13/03/2025 रोजी पहाटे 02.45 वा. चे सुमारास नाईस बेकरी समोर कुमठा नाका सोलापूर येथे आनंद नरसप्पा कत्तुल (वय 53 वर्षे, व्यवसाय-केबल ऑप्रेटर रा. प्लॉट नं.33 नवनाथ नगर, लक्ष्मी-नारायण थेटर पाठिमागे सोलापूर) व साक्षीदार रिक्षा नंबर MH 13 CT 2695 ने जात होते. अनोळखी पाच ते सहा इसमांनी रिक्षा आडवून आनंद नरसप्पा कत्तुल, रिक्षा चालक इस्माईल नबीलाल नदाफ व महेश पांडूरंग आवार यांना मारहाण केली. गळ्यास कोयता लाऊन हालला तर खलास करीन अशी धमकी देऊन फिर्यादी आनंद नरसप्पा कत्तुल यांच्या खिशातील रोख रक्कम रुपये 1,20,000/- जबदरस्तीने काढुन घेतले.

गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर बझार पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोसई नितीन शिंदे व त्यांचे पथकासह अनोळखी आरोपींचा शोध घेतला. पोकों/ सागर गुंड, पोकों/ हणमंत पुजारी यांना गोपनिय माहिती मिळाली की, ” दिनांक 13/03/2025 रोजी पहाटे 02.45 वा. चे सुमारास नाईस बेकरी समोर कुमठा नाका सोलापूर येथे पाच ते सहा इसमांनी रिक्षा आडवून त्यातील लोकांना मारहाण करुन त्या पैकी एका इसमाने रिक्षातील एका रिक्षातील इसमास गळ्यास कोयता लाऊन त्याचे खिशातील रोख रक्कम रुपये 1,20,000/- जबदरस्तीने काढून घेतले असून ते इसम सद्या शासकीय मैदान कुमठा नाका सोलापूर येथे आहेत.” या मिळालेल्या गोपनिय माहितीवरून सदर बझार पीलीय ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण पथक‌शासकिय मैदानावर गेले. तेथे पाच इसम बसलेले होते. ते गुन्हे प्रकटीकरण पथकास पाहून पळून जाऊ लागले. त्या सर्वांचा पाठलाग करुन त्यांना मैदानात पकडले.

01) मुन्ना मुर्तुज सय्यद वय-27 वर्षे रा-घर नंबर 64 विनायक नगर, राजराजेश्वरी शाळेशेजारी एमआयडीसी सोलापुर

02) सागर विजय शिंदे वय-20 वर्षे, रा- भगवान नगर झोपडपट्टी पोलीस मुख्यालय शेजारी सोलापुर,

03) विशाल रमेश बंदपट्टे वय-20 वर्ष रा- घर नंबर बी-5 पोलीस मुख्यालय शेजारी भगवान नगर झोपडपट्टी सोलापुर 04) संतोष महेश हुंडेकरी वय-30 वर्ष रा- पोलीस मुख्यालय घर नं. 458 भगवान नगर झोपडपट्टी सोलापुर

05) जयेंद्र युवराज जाधव वय 26 वर्षे रा-न्यु पाच्छा पेठ अशोक चौक, ईगल टेलर दुकानसमोर सोलापुर

अशी आरोपींची नावे आहेत.

सदर गुन्ह्याचे तपासात यातील आरोपीने केलेल्या निवेदना वरुन गुन्ह्यातील गेले रोख रक्कम पैकी 65,000/- रुपये व गुन्ह्यात वापरलेला कोयता तपासात जप्त केला आहे. सदर गुन्ह्यामध्ये अनोळखी आरोपींचा कोणताही पुरावा नसताना सदर बझार पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटिकरण पथकाने सदरचा गुन्हा 01 तासाचे आत उघडकीस आणला आहे.

सदरची कामगिरी मा.श्री. एम. राजकुमार, पोलीस आयुक्त, मा. विजय कबाडे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ, मा.श्री. यशवंत गवारे मा. सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-2, श्री. अजित लकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. भालचंद्र ढवळे पोलीस निरीक्षक (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोउपनि नितीन शिंदे, सहा. फौजदार औदुंबर आटोळे, पोहेको शहाजहान मुलाणी, पोहेकॉ राजेश चव्हाण, पोह/संतोष पापडे, पोह/सागर सरतापे, पोहेकॉ/एयाज बागलकोटे, पोकॉ/ सागर गुंड, पोकों/सोमनाथ सुरवसे, पोकों/ हणमंत पुजारी, पोकों/ अनमोल लट्टे, पोकों/ उमेश चव्हाण, पोकों/ राम भिंगारे, पोकों/परशुराम म्हेत्रे यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button