सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन
---Advertisement---

डॉल्बी नाहीच! शिवजयंती मिरवणूक पारंपरिक वाद्यांनीच काढण्याचा निर्धार

On: February 3, 2026 12:30 PM
Follow Us:
---Advertisement---
HTML img Tag Simply Easy Learning

Solapur Shivaji Maharaj Jayanthi News

HTML img Tag Simply Easy Learning

जयवंत सलगर उत्सव अध्यक्ष, उत्तरा बरडे, कृष्णा सुरवसे कार्याध्यक्ष

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : मध्यवर्ती शिवजन्मोत्सव महामंडळाची महत्त्वपूर्ण बैठक रविवार, दिनांक १ फेब्रुवारी रोजी डाळिंब आड येथील शिवजयंती मंडळाच्या मैदानात पार पडली. मावळते अध्यक्ष सुशिल बंदपट्टे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सन २०२५–२६ या वर्षासाठी मध्यवर्ती शिवजन्मोत्सवाचे नवे पदाधिकारी निवडण्यात आले.यंदाच्या उत्सव अध्यक्षपदी जयवंत सलगर यांची तर कार्याध्यक्षपदी उत्तरा बरडे- बचुटे, कृष्णा सुरवसे यांची निवड करण्यात आली.

या बैठकीत यंदाच्या शिवजयंती मिरवणुकीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाला फाटा देत, ढोल-ताशे, लेझीम, रणशिंग, तुतारी यांसारख्या पारंपरिक वाद्यांतूनच शिवजयंती मिरवणूक काढण्याचा निर्धार एकमताने करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, संस्कृती व विचार नव्या पिढीपर्यंत सुसंस्कृत पद्धतीने पोहोचवण्याचा उद्देश या निर्णयामागे असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या निर्णयाला उपस्थित सर्व शिवजयंती मंडळे व शिवप्रेमींनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला. यंदाची शिवजयंती सांस्कृतिक, शिस्तबद्ध व पारंपरिक पद्धतीने साजरी करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

या बैठकीस शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्ट अध्यक्ष पद्माकर काळे, पुरुषोत्तम बरडे,
राजन जाधव, चंद्रकांत वानकर, दिलीप कोल्हे, सुनील रसाळे, भाऊ रोडगे, विजय पुकाळे,लहू गायकवाड नगरसेवक शिवजी वाघमोडे, श्रीकांत डांगे, ज्ञानेश्वर सपाटे श्रीकांत घाडगे महादेव गवळी, मतीन बागवान, प्रकाश ननवरे, शिवा कामठी, प्रताप चव्हाण, सुरज बडगर, गणेश डोंगरे, अशोक कलशेट्टी, गजानन चक्रपाणी, आबा सावंत, सोनू खरात,जवाहर जाजू, पंकज काटकर, एडवोकेट रामचंद्र कदम, जीवन यादव ब्रह्मदेव पवार,यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मध्यवर्ती महामंडळामध्ये काम केलेले पदाधिकारी शिवाजी वाघमोडे, महादेव गवळी यांची यांची कन्या, विनोद भोसले, मंडळाचे ट्रस्टी अनिकेत पिसे, नगरसेवक झाल्या प्रित्यात मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.

नूतन पदाधिकारी असे :

अध्यक्ष – जयवंत सलगर, कार्याध्यक्ष – उत्तरा बरडे बचुटे, कृष्णा सुरवसे, उपाध्यक्ष – चारुशीला जगदाळे, संजीवनी मुळे, अनिरुद्ध पाटील, नामदेव पवार, रमेश जाधव, किरण भंडारी, सेक्रेटरी – पुरुषोत्तम भोगडे, सह सेक्रेटरी – अंबादास सपकाळ, खजिनदार – संदीप काशीद, सहखजिनदार – सुजित चौगुले, मिरवणूक प्रमुख – विजय पुकाळे, प्रसिद्धीप्रमुख – दीपक शेळके, कृष्णकांत चव्हाण, कुस्ती प्रमुख – विठ्ठल कलाकते बापू जाधव, कार्यालय प्रमुख – तुषार गायकवाड, कृष्णा भुरळे, देविदास घुले, सोमनाथ बनसोडे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe Youtube Channel

Join Now