ट्रक ड्रायव्हरकडे मिळाला गावठी कट्टा!
Solapur Taluka Police Station Gavathi Katta News
सोलापूर : सोलापूर तालुका, पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने 40,000 रूपये किंमतीचे देशी बनावटीचा गावठी कट्टा जप्त करून एका तरुणाला अटक केली आहे.
सुग्रीव उत्तरेश्वर करंडे (वय 26, रा. होनसळ ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याची पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे. आरोपी सुग्रीव हा ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करतो. प्राथमिक माहितीनुसार त्याने स्वतः वापरण्यासाठी हे शस्त्र आणले होते.
आगामी विधानसभा 2024 ची निवडणुक शांततेत पार पाडुन निवडणुकीच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी या अनुषंगाने सोलापूर तालुका, पोलीस ठाणे चे प्रभारी अधिकारी पोनि/राहुल देशपांडे यांनी पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हे प्रकटीकरणातील पोलीस अंमलदार यांना विनापरवाना बेकायदेशीर अग्नीशस्त्र बाळगुन फिरणा-या इसमाची गोपनियरित्या माहिती संकलित करून त्यांचे विरूध्द कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्या प्रमाणे गुन्हे प्रकटीकरणातील पोलीस अंमलदार अशा इसमांची माहिती संकलित करीत होते. दरम्यान दिनांक 04.10.2024 रोजी पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांना सोलापूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर होनसळ फाटा येथे एक इसम त्याचे कब्जात देशी बनावटीचा गावंठी कट्टा बाळगुन आहे अशी त्यांचे गोपनिय बातमीदारमार्फत बातमी मिळाली होती.
मिळालेल्या बातमी प्रमाणे पोनि/राहुल देशपांडे यांनी सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील सहायक पोलीस निरीक्षक मनोज अभंग व गुन्हे प्रकटीकरणातील अंमलदार यांचे पथक तयार त्यांना मिळालेल्या बातमीचा आशय सांगुन सदर ठिकाणी जाऊन खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे सपोनि/अभंग व पथक असे सोलापूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर होनसळ फाटा येथे जाऊन मिळालेल्या बातमीतील संशयित इसमाचा शोध घेतला. तेंव्हा तेथे एक काळया रंगाची पॅन्ट व पांढरा हिरव्या रंगाचा फुल बाहयाचा शर्ट घातलेला समोरील बाजुस विरळ केस असलेला इसम मिळुन आला. त्या इसमाचा पथकातील अधिकारी व अंमलदार यांना संशय आल्याने त्या सर्वांनी त्यास ताब्यात घेणे करीता जात असताना त्या इसमास पोलीस पथकाची चाहुल लागल्याने तो पळुन जाण्याच्या तयारीत असताना पथकातील सर्वांनी त्यास शिताफीने गराडा घालुन जागीच पकडुन त्याची अंगझडती घेतली. तेंव्हा त्याच्या कंबरेच्या मध्य बाजुस पॅन्टच्या आत मध्ये खोचुन ठेवलेला एक देशी बनावटीचा कट्टा मिळुन आला. तेंव्हा त्या इसमास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्याचेकडे शस्त्र बाळण्याच्या परवाना आहे काय असे विचारले असता त्यांने त्याचेकडे परवाना नसल्याचे सांगितले.
ताब्यात घेतलेल्या इसमाच्या कब्जाजुन 40,000/-रूपये किंमतीचा एक देशी बनावटीचा गावंठी कट्टा विनापरवाना बेकायदेशीर आपले कब्जात बाळगलेल्या परिस्थितीत मिळुन आला म्हणुन त्या बाबत पोलीस नाईक लालसिंग तुकाराम राठोड, नेमणुक सोलापूर तालुका, पोलीस ठाणे यांनी पोलीस ठाणेस फिर्याद दिल्याने त्याचे विरूध्द भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3, 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार राहुल महिंद्रकर हे करीत आहेत. ताब्यात घेतलेल्या इसमास अटक करून दिनांक 05.10.2024 रोजी मा.न्यायालया समक्ष हजर केले असता मा.न्यायालयांनी त्याची दिनांक 07.10.2024 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.
यापुढेही अशा प्रकारे विनापरवाना बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगुन फिरणा-या इसमांची माहिती संकलित करून ते मिळुन आलेस त्याचे विरूध्द अशा प्रकारे कायदेशीर कारवाई करणार असल्याचे मा.श्री.संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर यांनी सांगितले आहे.
सदरची कारवाई मा.श्री.अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, मा.श्री.प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, मा.श्री.संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली श्री.राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी सोलापूर तालुका,पोलीस ठाणे यांचे नेतृत्वाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक मनोज अभंग,पोलीस हवालदार राहुल महिंद्रकर, नागेश कोणदे, पोलीस नाईक लालसिंग राठोड, अनंत चमके, पोलीस अंमलदार पैंगबर नदाफ व वैभव सुर्यवंशी यांनी पार पाडली आहे.
(बातमीसोबत वापरलेले छायाचित्र संग्रहित आहे.)